शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आवळी एमआयडीसीच्या भूसंपादनास वेग, कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग विस्तारणार 

By पोपट केशव पवार | Updated: December 3, 2024 17:39 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव व पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील जागा संपल्याने उद्योगांचा विस्तार कसा करायचा, असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव व पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील जागा संपल्याने उद्योगांचा विस्तार कसा करायचा, असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे. गेल्या काही वर्षांतील ही समस्या लक्षात आल्यानंतर तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकासवाडी, आवळी, कौलव, अकिवाट या ठिकाणी नव्या एमआयडीसींची घोषणा केली होती. गेल्या पाच वर्षांत या प्रस्तावित एमआयडीसींचे काय झाले, त्यांची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे याचा आढावा घेणारी ही मालिका आजपासून..पोपट पवार कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतींमधील उद्योग विस्ताराला चालना देण्यासाठी आवळी (ता. पन्हाळा) येथे २५२ हेक्टरवर उभारण्यात येणाऱ्या एमआयडीसीच्या प्रक्रियेला विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा वेग आला आहे. या एमआयडीसीच्या भूसंपादनाची अधिसूचना निघाली असून, येत्या वर्षभरात भूसंपादन करण्याचे नियोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने केले आहे. या एमआयडीसीमुळे शाहूवाडीसह पन्हाळा तालुक्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्धी होणार आहे.शाहूवाडी तालुक्यातील डोनोळी व पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे एमआयडीसी उभारण्यासाठी राज्य सरकारच्या उद्योग विभागाने एप्रिल २०२३ मध्ये तत्त्वत: मान्यता दिली होती. या जागांची भू-निवड समितीने पाहणीही केली होती. यात आवळी येथील २५२ हेक्टर क्षेत्राच्या प्रस्तावाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिल्यानंतर ३० ऑगस्ट २०२४ ला आवळी येथील एमआयडीसीसाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली. येत्या वर्षभरात हे भूसंपादन करून पुढील पूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने सुरू केले आहे.नव्या महामार्गामुळे याला महत्वरत्नागिरी-नागपूर हा महामार्ग याच एमआयडीसीजवळून गेला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या उद्योजकांना उत्पादनाच्या वाहतुकीसाठीची कटकट थांबणार आहे. जिल्ह्यात सध्या उद्योगाच्या विस्तारीकरणाला जागाच नसल्याने नव्या एमआयडीसीची गरज होती. ही एमआयडीसी वर्षभरात पुर्णत्वास जाणार असल्याने उद्योग विस्तारण्यासाठी आवळीचा पर्याय अनेकजण स्वीकारु शकतात.

डोंगराळ भागात रोजगाराच्या संधीशाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ भागातील अनेक तरुण सध्या पुण्या-मुंबईला तुटपुंज्या वेतनावर काम करतात. शिवाय या मतदारसंघातील काही तरुण शिरोली, गोकुळ शिरगाव या एमआयडीसींमध्ये कामाला आहेत. आवळी येथे एमआयडीसी झाल्यानंतर नोकरीसाठी दूर गेलेल्यांना घरापासून जवळ काम मिळणार आहे. त्यामुळे हे तरुण परत गावाकडे येऊ शकतात.

दृष्टिक्षेपात आवळी एमआयडीसी

  • मान्यता : एप्रिल २०२३
  • क्षेत्र : २५२ हेक्टर.

आवळी येथे २५२ हेक्टरवर एमआयडीसी उभी केली जाणार आहे. याची प्रक्रिया पूर्णत्वास गेली असून, वर्षभरात भूसंपादन करून पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन आहे. - उमेश देशमुख, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, कोल्हापूर 

उद्योगांबाबत सरकारचे चांगले धोरण असल्याने प्रत्येकाला एमआयडीसीमध्येच उद्योग उभा करायचा आहे. त्यामुळे विस्तारीकरण व नवीन उद्योगांना जागा देण्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशावेळी आवळी येथील एमआयडीसी या उद्योजकांसाठी लाभदायी ठरणार आहे. -सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक, शिरोली

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी