शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:29 IST

अमेरिकेतील मराठी माणसांच्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कोल्हापूरातील साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देकृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कारमहाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर : पुण्यात १२ जानेवारीला वितरण

कोल्हापूर : अमेरिकेतील मराठी माणसांच्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कोल्हापूरातीलसाहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे.महाराष्ट्र फाउंडेशनमार्फत दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य क्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. २0१९ या वर्षासाठी साहित्य प्रकारातील पुरस्कारासाठी प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीचा विचार करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण १२ जानेवारी २0२0 रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत माहिती हक्क कार्यकर्त्या अरुणा रॉय यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष अंकुश कर्णिक, पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख उपस्थित राहणार आहेत.

रिंगाण विस्थापितांच्या जगण्याची कहाणीरिंगाण या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण आलेले आहे. देवाप्पाच्या पाळीव म्हशी रानटी होतात, त्यांच्या मूळपदावर जातात आणि त्यातून त्यांचा नि देवप्पाचा संघर्ष उभा राहतो. कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात. नवद्दोत्तरी काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून प्रा. खोत यांची  ओळख आहे.

गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांच्या गावठाण, रौंदाळा, झडझिंबड आणि धूळमाती या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय नांगरल्याविन भुई हे ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळणे हे आनंददायी आहे. यानिमित्ताने विस्थापितांच्या जगण्याचा विषयाकडे कांही लोकांचे लक्ष वेधले जाईल. केवळ धरणग्रस्तच नव्हे तर माणूसच विस्थापित झाला आहे. यानिमित्ताने माझ्या लेखनाचा सन्मान झाला आहे, असे मी मानतो. महाराष्ट्र फाउंडेशनची ही चांगली परंपरा आहे. अनेक मान्यवरांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यात माझा समावेश केल्याबद्दल मला आनंदच वाटतो.प्रा. कृष्णात खोत, साह्त्यििक, कोल्हापूर.

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर