शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

दादा आहले यांच्या नावाने पुरस्कार गडहिंग्लजमध्ये पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 10:33 AM

Footbal Kolhapur : दरवर्षी गडहिंग्लजमध्ये भरणाऱ्या अखिल भारतीय युनायटेड फुटबॉल स्पर्धेतील शिस्तबध्द संघाला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे ( विफा) जेष्ठ संचालक दादा आहले यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय येथील शोकसभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देदादा आहले यांच्या नावाने पुरस्कार गडहिंग्लजमध्ये पुरस्कार पुसदचे फुटबॉलपटू :'युनायटेड फुटबॉल'च्या शोकसभेत घोषणा

गडहिंग्लज:दरवर्षी गडहिंग्लजमध्ये भरणाऱ्या अखिल भारतीय युनायटेड फुटबॉल स्पर्धेतील शिस्तबध्द संघाला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे ( विफा) जेष्ठ संचालक दादा आहले यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय येथील शोकसभेत घेण्यात आला.पुसद (जि. यवतमाळ) येथील जेष्ठ फुटबॉल संघटक आहले यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.गडहिंग्लज सारख्या ग्रामीण भागात भरणाऱ्या फुटबॉल जत्रेचे त्यांना खूप कौतुक होते.त्यामुळे दिवाळीला गडहिंग्लजमध्ये लोकवर्गणीतून होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित शोकसभेत आहले  यांना आदरांजली वाहण्यात आली.

येथील एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर ही सभा झाली.अध्यक्षस्थानी 'युनायटेड'चे अध्यक्ष अरविंद बारर्देस्कर होते. दादांचे फुटबॉल प्रसाराचे प्रेरणादायी कार्य पुढे नेण्याचा निर्णय यावेळी झाला. बारर्देस्कर म्हणाले, दादांनी फुटबॉल क्षेत्रात केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे. खरी आदराजंली ठरेल.या हंगामातील स्पर्धा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेतली जाईल.

यावेळी युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे, प्रशांत दड्डीकर, महेश सुतार, उमेश देवगोंडा, सौरभ जाधव, ओंकार सुतार, ओंकार घुगरी, अनिकेत कोले यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. याप्रसंगी मिरजेचे फुटबॉलपटू भगवान कांबळे यांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली. भुपेंद्र कोळी यांनी सर्वांचे स्वागत केले. दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात आहले यांच्या कामगिरीचा आढावा घेतला.मनिष कोले यांनी आभार मानले.दरवर्षी गडहिंग्लजच्या मैदानावर हजेरी!आहले यांनी पुसदमध्ये मैदानावर निधन झालेल्या आपल्या सहकाऱ्याच्या स्मरणार्थ सुरू केलेली अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा गेली ४५ वर्षे अखंडपणे सुरू आहे.त्यांनी 'विफा'चे उपाध्यक्ष, पुसदच्या चेतना क्रिडा मंडळाचे अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव पदही भुषवले.राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी ते दरवर्षी गडहिंग्लजला आवर्जून येत होते. 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर