शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्काराने साहित्याची उंची वाढत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:13 IST

निपाणी : पुरस्काराने कोणत्याही साहित्याची उंची वाढत नाही, तर लेखकाने लिहलेले साहित्य जास्त लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. आज मराठी ...

निपाणी : पुरस्काराने कोणत्याही साहित्याची उंची वाढत नाही, तर लेखकाने लिहलेले साहित्य जास्त लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. आज मराठी साहित्याची अवस्था भयानक असून, वाचकांची संख्या घटलेली आहे. आज लेखकाचे आयुष्य संपते, पण त्याने लिहिलेल्या साहित्याची पहिली आवृत्ती संपत नाही, अशी काहीशी अवस्था आहे. मराठी साहित्याकडे वाचकांनी पाठ फिरवली आहे. याची गंभीर दखल सर्वांनी घेतली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले.कारदगा येथे शहीद सुनील भोसले व्यासपीठावर पार पडलेल्या २३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले, कारदगा हे गाव साहित्याचा जल्लोष करणारे गाव आहे. पालावरच साहित्य हे पानावर येण्यास ग्रामीण साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनापेक्षा अशी ग्रामीण संमेलने महत्त्वाची आहेत कारण हे सर्वांपर्यंत पोहोचत आहे. अभिव्यक्तीची मुस्कटदाबी झाल्याशिवाय साहित्यिकांना संधी मिळत नाही.यावेळी व्यासपीठावर ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, डॉ. आनंद काटीकर, डॉ. सी. बी. कोरे रेंदाळकर, ग्रामपंचायत अध्यक्षा शिऊबाई गावडे, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, उत्तम पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुमित्रा उगळे, लक्ष्मणराव चिंगळे, दादासो नरगट्टे, चंद्रकुमार नलगे, रामभाऊ पाटील, कल्पना रायजाधव, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कल्पना रायजाधव यांच्या ‘आम्ही घडलो तुम्हीही घडा’ या व कबीर वराळे यांच्या ‘किलबिल’ व ‘महाचंद्र’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. सकाळी संपूर्ण गावात ग्रंथ दिंडी काढण्यात आली.दुसऱ्या सत्रात नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांचे ‘आम्ही वारसदार मावळ्यांचे’ या विषयावर व्याख्यान झाले. शास्वत ग्रामविकासावर चंद्रकांत दळवी यांचे व्याख्यान झाले. प्रसिद्ध कवी नितीन देशमुख, नारायण पुरी, रवींद्र केसकर यांनी कविता सादर केल्या.मराठी साहित्य वाढावेरा. रं. बोराडे म्हणाले की, कारदगा गावाने मराठीपण जपलेच, पण कन्नड भाषेचा अभिमान ठेवला. आज साहित्य संमेलन गावोगावी होतात, पण मराठी भाषेचा वाचक वाढला का? हा प्रश्न आहे. कन्नडमधील अनेक पुस्तके मराठीत आली, पण मराठीतील पुस्तके कन्नड भाषेत प्रकाशित होणे गरजेचे आहे. साहित्य किती लोकांपर्यंत पोहोचले यावर त्याची उंची ठरते.