शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी रंगपंचमी टाळा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 10:59 IST

हुल्लडबाजी व महिलांची छेडछाड करणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करण्याकरिता स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. या सर्व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

ठळक मुद्देअभिनव देशमुख _- इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या अंगावर, कपड्यांवर रंग फेकू नये व लावू नये.

कोल्हापूर : जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आज, शुक्रवारी साजरी होणारी रंगपंचमी गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी न करता घरगुती पद्धतीने साजरी करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केले.

देशमुख म्हणाले, सध्या जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी शक्यतो घराबाहेर न पडता तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून गर्दी न करता रंगपंचमी साजरी करण्याबाबत दक्षता घ्यावी. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या अंगावर, कपड्यांवर रंग फेकू नये व लावू नये. परीक्षा केंद्राच्या आसपास व परिसरामध्ये गर्दी, गोंगाट करून शांततेचा भंग करू नये. मोटारसायकलीच्या पुंगळ्या काढून मोटारसायकली फिरवू नयेत. परीक्षा केंद्राच्या आसपास डॉल्बी किंवा ध्वनिक्षेपक लावून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नये.

मोटारसायकलीवरून रॅली काढून रंगांची उधळण करण्यास सक्त मज्जाव करण्यात येत आहे. रंगपंचमी खेळताना रंगामध्ये विषारी पदार्थ अथवा रसायनमिश्रित रंगांचा वापर करू नये. रंगपंचमीच्या अनुषंगाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हुल्लडबाजी व महिलांची छेडछाड करणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करण्याकरिता स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. या सर्व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. 

 

अफवा पसरवणा-यांवर कारवाई : डॉ. अभिनव देशमुखसमाजमाध्यमांवर प्रसिद्ध वृत्तवाहिन्यांच्या नावांचा वापर करून तसेच स्क्रीन शॉटचा वापर करून कोरोनाविषयी अफवा पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाही. अशा पोस्ट कोण टाकत असल्यास तत्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी. यावर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा अफवा पसरविणा-यांवर कडक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असा इशारा पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसrangoliरांगोळी