शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी अविनाश भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:12 IST

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नाशिकचे अ‍ॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे अमोल सावंत, तर बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या सदस्यपदी सतीश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. कोल्हापूरच्या विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुधवारी मुंबईच्या बार कौन्सिलच्या कार्यालयात ही निवड झाली.

ठळक मुद्देउपाध्यक्षपदी अमोल सावंत, बार कौन्सिल आॅफ इंडिया सदस्य सतीश देशमुखमुंबईच्या कार्यालयात झाली निवड : विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी

कोल्हापूर : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नाशिकचे अ‍ॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे अमोल सावंत, तर बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या सदस्यपदी सतीश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. कोल्हापूरच्या विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुधवारी मुंबईच्या बार कौन्सिलच्या कार्यालयात ही निवड झाली.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणूक रिंगणात २५ जागांसाठी राज्यातून १६४ उमेदवार उभे होते; त्यासाठी ५९ हजार सदस्यांनी मतदान केले. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पार पडलेल्या निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतून १७ उमेदवारांनी निवडणूक लढविली.

या उमेदवारांना राज्यभरातून वकिलांनी मतदान केले. ५ मे २०१८ पासून जिल्हानिहाय मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीला १० महिन्यांचा कालावधी लागला. बुधवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांची निवड करण्यात आली. कमिटीचा पाच वर्षांचा कार्यकाल आहे.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारीअध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे (नाशिक), उपाध्यक्ष अमोल सावंत (औरंगाबाद), बार कौन्सिल अ‍ॅड इंडिया सदस्य सतीश देशमुख (हिंगोली), वेल्फेअर सदस्य विवेक घाटगे (कोल्हापूर), सदस्य आशिष देशमुख (पुसद-यवतमाळ), गजानन चव्हाण (ठाणे), विठ्ठल देशमुख (मुंबई), परिजात पांडे (नागपूर), राजेंद्र उमाप (पुणे), जयवंत जयभावे (नाशिक), हर्षद निंबाळकर (पुणे), अविनाश आव्हाड (पुणे), संग्राम देसाई (सिंधुदुर्ग), वसंत साळुंखे (औरंगाबाद), मोतीसिंग मोहता (अकोला), आनंदराव पाटील (लातूर), असिफ कुरेशी (नागपूर), उदय वारूंजकर(मुंबई), मिलिंद पाटील (उस्मानाबाद), मिलिंद थोबडे (सोलापूर), अनिल गोवरदिपे (नागपूर), सुभाष घाटगे (मुंबई), सुदीप पासबोला (ठाणे), वसंतराव भोसले (सातारा), अहमदखान पठाण (पुणे).पूरग्रस्त वकिलांना मदतकोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त वकिलांना मदत मिळावी, यासाठी अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी बार कौन्सिलकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्याला तत्वत: मान्यता देत सुरुवातीला साडेसात लाख रुपये मंजूर करून ते दिले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर