शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘सतेज कृषी’ प्रदर्शनात तासाभरात १२.३५ लाखांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 16:24 IST

तपोवन मैदानावर शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन खुले झाले असून, पहिल्याच दिवशी तासाभरात दोन ट्रॅक्टरच्या विक्रीतून तब्बल १२ लाख ३५ हजारांची उलाढाल झाली. हे प्रदर्शन चार दिवस खुले राहणार असून, जातिवंत पशुपक्ष्यांसह शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्दे‘सतेज कृषी’ प्रदर्शनात तासाभरात १२.३५ लाखांची उलाढालशेतीचे आधुनिक तंत्रज्ञान एकाच छताखाली

कोल्हापूर : तपोवन मैदानावर शुक्रवारपासून सतेज कृषी प्रदर्शन खुले झाले असून, पहिल्याच दिवशी तासाभरात दोन ट्रॅक्टरच्या विक्रीतून तब्बल १२ लाख ३५ हजारांची उलाढाल झाली. हे प्रदर्शन चार दिवस खुले राहणार असून, जातिवंत पशुपक्ष्यांसह शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सतेज कृषी प्रदर्शन २०१९’चे शुक्रवारी सायंकाळी महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, प्रतिमा सतेज पाटील, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, करवीरचे उपसभापती सागर पाटील, शशिकांत खोत, बाबासाहेब चौगुले, विनोद पाटील, धीरज पाटील, आदी उपस्थित होते.प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून यंदा २५० हून अधिक पशू, पक्षी, कृषी अवजारे, खाद्यासह इतर वस्तूंचे स्टॉल सहभागी झाले आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यापासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. जर्मन कंपनीचा ‘कुबोटा’ कंपनीचा ‘४५-एचपी’च्या ट्रॅक्टरची सात लाख ७५ हजार रुपये, तर ‘२१ एचपी’च्या ट्रॅक्टरची चार लाख ६० हजार रुपयांनी विक्री झाली. पहिल्याच दिवशी तेही उद्घाटनानंतर तासाभरात तब्बल १२ लाख ३५ हजारांची विक्री झाली. ट्रॅक्टरच्या चाव्या आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना देण्यात आल्या.प्रदर्शनातील आकर्षण

  • पाच फूट लांब शिंगे असणारी ‘पंढरपुरी म्हैस’
  • भली मोठी पिवळी सिमला मिरची
  • तुरेवाला कोंबडा
  • तीन लाखांची मुरा म्हैस
  • २.४ फुट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण गाय
  • नांदेडची गलबेल लाल गंधारी गाय
  • गिनीपिग अश्व
  • आधुनिक तंत्रज्ञानाची कृषियंत्रे
  • तांदूळ महोत्सव : विविध वाणांचे खात्रीशीर तांदूळ

 

 

 

टॅग्स :agricultureशेतीkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलExhibitionप्रदर्शन