शहरं
Join us  
Trending Stories
1
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
2
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
3
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
4
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
6
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
7
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
8
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
9
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
10
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
11
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
12
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
13
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
14
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
15
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
16
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
17
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
18
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
19
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
20
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

आवळे, शेट्टींची भूमिका सत्तेत ठरणार निर्णायक

By admin | Updated: February 26, 2017 00:48 IST

शिरोळ, हातकणंगलेत त्रांगडे : कागलमध्ये चिठ्ठीवर सत्ता

कोल्हापूर : शिरोळ, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, चंदगड व हातकणंगले पंचायत समित्यांमध्ये सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. हातकणंगलेत माजी मंत्री जयवंतराव आवळे, तर शिरोळ, गडहिंग्लज, चंदगडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. राधानगरीत राष्ट्रवादी व काँग्रेस-शिवसेनेचे बलाबल समान असले तरी सभापतिपदाचा उमेदवार केवळ राष्ट्रवादीकडे असल्याने तिथे फारशी अडचण येणार नाही. कागलमध्ये मात्र समान बलाबल असल्याने चिठ्ठीच सत्तेचा लंबक ठरवणार आहे. शिरोळ पंचायत समितीमध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संख्याबळ ६ होते. स्वाभिमानीचे चार, तर भाजप व शिवसेनेचे तीनपर्यंत संख्याबळ पोहोचते. येथे ‘स्वाभिमानी’ची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिरोळमध्ये सत्तेसाठी मदत करणाऱ्यांना जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’ मदत करेल, अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. त्यात शेट्टी यांना आमदार उल्हास पाटील यांची अ‍ॅलर्जी असल्याने ते दोन्ही काँग्रेससोबतच राहतील, असा अंदाज आहे. हातकणंगलेत ६ भाजप, ५ जनसुराज्य, ५ ताराराणी आघाडी (प्रकाश आवाडे गट), ३ स्वाभिमानी, २ शिवसेना व १ जयवंतराव आवळे असे बलाबल आहे. भाजप-जनसुराज्य यांची गोळाबेरीज ११ होते. त्यांना एका सदस्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी-शिवसेना व आवाडे गट एकत्र आले तर दहा संख्याबळ होते, पण जयवंतराव आवळे हे आवाडे यांच्याबरोबर राहतील, अशी आजची तरी परिस्थिती नाही. त्यामुळे आवळे हे भाजप-जनसुराज्य आघाडीला पाठिंबा देऊन उपसभापतिपद पदरात पाडून घेऊ शकतात. गडहिंग्लजमध्ये भाजप ३, राष्ट्रवादी, ताराराणी व कॉँग्रेस प्रत्येकी दोन, तर स्वाभिमानी एक असे बलाबल आहे. येथे भाजप-ताराराणी एकत्र आली तर संख्याबळ पाच आणि दोन्ही काँग्रेस एक झाले तर चार होते. येथे ‘स्वाभिमानी’ने दोन्ही कॉँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला तरीही समान बलाबल होऊन निर्णय चिठ्ठीवर राहू शकतो. चंदगडमध्ये तीन कॉँग्रेस, भाजप-स्वाभिमानी प्रत्येकी एक, तर युवक क्रांती तीन असे बलाबल आहे. येथे सभापतिपद हे खुले असल्याने सर्वच राजकीय पक्षातून जोडण्या सुरू झाल्या आहेत. स्वाभिमानीने सभापतिपदाचा आग्रह धरल्याने सर्वच पक्षांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारणही होऊ शकते. कागलमध्ये पाच राष्ट्रवादी कॉँग्रेस तर पाच शिवसेनेचे सदस्य आहेत. सर्वसाधारण महिलेसाठी सभापतिपद आरक्षित आहे. राष्ट्रवादीकडे एक, तर शिवसेनेकडे दोन महिला दावेदार आहेत. निवडणुकीतील वार ताजे असल्याने येथे अंतर्गत एकमेकांचे कितीही मधूर संबंध असले तरी फोडाफोडीचे राजकारण कठीण आहे. त्यामुळे येथे चिठ्ठीवरच सभापतीची लॉटरी लागणार आहे. राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादी पाच, कॉँग्रेस चार व शिवसेना एक असे बलाबल आहे. सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आहे, हा एकमेव उमेदवार राष्ट्रवादीकडे असल्याने तिथे फारशी अडचण येणार नाही. जिल्हा परिषदेतील समीकरण महत्त्वाचेजिल्हा परिषद सत्तेच्या राजकारणात शिवसेनेसह स्थानिक आघाड्यांना कमालीचे महत्त्व आले आहे. त्यामुळे युवक क्रांती आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भुदरगडची शाहू आघाडी, कोल्हापूर ताराराणी आघाडी यांचे आठ सदस्य निर्णायक आहेतच, पण शिरोळ, चंदगड, हातकणंगले, गडहिंग्लज पंचायत समितीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या आघाड्यांनी अजून पत्ते खोलले नाहीत. अद्याप चर्चा थंडच!सर्वच तालुक्यांतील नेतेमंडळी जिल्हा परिषद सत्तेच्या गणितात अडकले आहेत. त्यामुळे पंचायत समित्यांच्या गोळाबेरीजकडे कोणाचेच लक्ष नाही. निकाल लागून चार दिवस उलटले तरी अद्याप तालुक्यांतील नेत्यांच्या पातळीवर चर्चा थंडच दिसत आहे.