शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

५२ दिवसांचा संप आत्मकेंद्रित करणारा

By admin | Updated: September 18, 2015 23:37 IST

वस्त्रनगरीला सुमारे ४५०० कोटी रुपयांचा फटका : १५० कारखान्यांतील संपाचा परिणाम पूर्ण वस्त्रोद्योगावर--बावन्न दिवसांचा लेखा जोखा

राजाराम पाटील -- इचलकरंजी  यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब व्हावी, या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने ५२ दिवसांचा संप केला. १५० सायझिंग कारखान्यांतच संप असला तरी त्याचे परिणाम यंत्रमाग उद्योगावर व पर्यायाने वस्त्रनगरीवर झाले. या काळात सुमारे चार हजार ५०० कोटी रुपयांचा फटका येथील वस्त्रोद्योगाला बसला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.इचलकरंजी औद्योगिक क्षेत्रात विक्रमी ठरलेला हा संप कामगार व उद्योजकांबरोबरच दोन्ही बाजूच्या संघटनांनासुद्धा बरेच काही सांगणारा आणि त्यांना आत्मकेंद्रित होण्यास लावणारा ठरला. संपाला कामगार चळवळीबरोबरच राजकीय वलयही होते. वस्त्रोद्योगात असलेली कमालीची मंदी, कामगार संघटनेशी चर्चा नाही अशी सायझिंग असोसिएशनची टोकाची भूमिका, आजी-माजी आमदार आणि खासदारांचे तोकडे पडणारे प्रयत्न, त्यातून घालण्यात येणारा मतांचा बेरीज-वजाबाकीचा ताळमेळ, स्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव, व्हॉटस् अ‍ॅपवर होणारी शेरेबाजी-टीकाटिप्पणी असे अनेक पैलू या संपाला होते. मात्र, ५२ दिवसांचा हा संप सर्व क्षेत्रातील कामगार व उद्योजक-व्यावसायिकांना अभ्यास करण्याचा विषय ठरला. यातून बरेच काही शिकल्यानंतर संपाबाबत होणाऱ्या चुका, संपाची लांबत जाणारी प्रक्रिया आणि राजकीय खेळी आता सुधारल्या पाहिजेत, असेच मत सर्वसामान्य नागरिकांचे आहे. ५२ दिवसांचा लेखाजोखा मांडताना लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे की, सुधारित किमान वेतन जाहीर करताना शासनाने प्रस्तावित मसुद्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने बदल करून २९ जानेवारी २०१५ ला आदेश काढला. किमान वेतन देणे हे मालकांना बंधनकारक आहे. वाढत जाणाऱ्या महागाईबरोबर वेतनामध्ये वाढ होणार, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. फेब्रुवारी ते जुलै या सहा महिन्यांमध्ये किमान वेतनाबाबत मालकांकडून कोणतीच हालचाल न झाल्याने अखेरीस कामगारांनीच संपाचा निर्णय घेतला. युनियनवर प्रचंड दबाव वाढला. कामगार लढायला तयार असताना युनियनला बाजूला जाणे अशक्य होते. त्यामुळेच २० जुलै रोजी संप सुरू करण्यात आला.५२ दिवस लांबलेला संप संपुष्टात आणण्याची कामगारांच्यादृष्टीने महत्त्वाची बाब बनली होती. कायदेशीर हक्काला बाधा येणार नाही आणि कामगारांना तात्पुरता लाभ व्हावा, यादृष्टीने तोडगा आवश्यक होता. वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याच अटीवर ५०० रुपयांची वाढ मान्य करावी, असा तोडगा मांडला. मात्र, मालक संघटनेने एक रुपयाही देणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे संप लांबला. कामगारांना काय मिळाले, असा प्रश्न विचारत असताना मालकांना काय मिळाले, असा प्रश्न विचारणे उचित ठरेल. कोणत्याही परिस्थितीत चर्चा नाही, या मालकांच्या भूमिकेमुळे २०१३ साली अपमानित झालेल्या कामगारांचा संताप वाढत जाऊन लढ्याची अधिक ताठर भूमिका वाढत गेली, हे सत्य आहे. अंतिमत: मात्र कामगारांना दरमहा ७०० रुपयेपेक्षा अधिक अंतरिम वाढ देऊन कारखाने चालू करण्यात आले आहेत. (समाप्त)शासनाला जाग आणि पीस रेट : गौड   सायझिंगधारक कृती समितीचे प्रकाश गौड म्हणाले, ५२ दिवसांनंतर ५०० रुपयांची वाढ यामुळे कामगार संघटनेचे खच्चीकरण झाले. महाराष्ट्रात फक्त १५० सायझिंगधारकांनाच किमान वेतनाबाबत लक्ष्य केले गेले व संप लांबविला गेला. त्यामुळे शासनाला जाग आली आणि टाईम रेटचे किमान वेतन पीस रेटवर बदलले जात आहे, हेच या संपाचे फलित आहे.सर्वसामान्य नागरिक भरडले : कोष्टी   --इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी म्हणाले, संपामुळे येथील वस्त्रोद्योगाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामध्ये कामगारांबरोबर सायझिंगधारक, यंत्रमागधारक, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य इचलकरंजीकरसुद्धा भरडला गेला. कामगार संघटनांनीसुद्धा आता संपाचे हत्यार उपसताना तो लांबवायचा किती, याचा विचार केलाच पाहिजे.चर्चेची दारे उघडी पाहिजेत : महाजनयंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले, संप मालक व कामगार असा दोन्ही बाजूला लक्षवेधी ठरला. दोघांनीसुद्धा संप किती ताणवावा, याचे तारतम्य बाळगले पाहिजे. मर्यादा असल्या पाहिजेत.संपाचे आंदोलन सुरू असताना चर्चेची दारे उघडी असली पाहिजेत. त्यातूनच सन्माननीय व व्यवहार्य तोडगा निघतो, हेच या संपाने शिकवले.