शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनांपुढे ‘प्राधिकरण’ सरकेना, पावणेदोन वर्षांत अवघे ८२ बांधकाम परवाने मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 16:11 IST

स्थापना होऊन पावणेदोन वर्षे झाली, तरी आश्वासनांपुढे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे काम सरकलेले नाही. अपेक्षित गतीने बांधकाम परवाने मिळत नसल्याने ग्रामीण आणि शहरातील भागांतील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देआश्वासनांपुढे ‘प्राधिकरण’ सरकेना, पावणेदोन वर्षांत अवघे ८२ बांधकाम परवाने मंजूर३० गावांच्या विरोधातील ठराव

संतोष मिठारी

कोल्हापूर : स्थापना होऊन पावणेदोन वर्षे झाली, तरी आश्वासनांपुढे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे काम सरकलेले नाही. अपेक्षित गतीने बांधकाम परवाने मिळत नसल्याने ग्रामीण आणि शहरातील भागांतील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

आतापर्यंत सुमारे ८२ बांधकाम परवाने प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून मंजूर झाले आहेत. प्राधिकरणाबाबतच्या अडचणी सोडविणे, प्रश्न मार्गी लावणे आणि विकासकामांबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही.निधी नाही, परवाने मिळविण्याची किचकट प्रक्रिया, विकासाच्या दृष्टीने नेमके काय करणार, याची स्पष्टता शासनाकडून होत नसल्याने ‘प्राधिकरण नकोच’ अशी भूमिका ३0 गावांनी घेतली आहे. प्राधिकरण विरोधी कृती समितीच्या माध्यमातून या गावांनी लढा सुरू केला आहे.कोल्हापूर शहराच्या सभोवती असलेल्या विविध ४२ गावांना एकत्रित करून राज्यशासनाने प्राधिकरण स्थापन केले. या गावांना विकासाचे दिवास्वप्न दाखविले. प्राथमिक स्थितीत ग्रामस्थांच्या सर्व मागण्या पालकमंत्री पाटील यांनी मान्य करीत प्राधिकरण स्वीकारावे, अशी विनवणी केली; मात्र बांधकाम परवाने देण्याचे अधिकार प्राधिकरणाने आपल्याकडे ठेवल्यानंतर ग्रामस्थ खडबडून जागे झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी ‘प्राधिकरण नको, आमचा गावच बरा’ अशी भूमिका घेतली.

लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर महापुराच्या परिस्थितीमुळे शासन आणि कृती समितीचे प्राधिकरणाबाबतची पाऊले थांबली आहेत. प्राधिकरणातील ४२ गावांबाबत शासनाकडून बांधकाम परवाने उपविधी अद्याप मंजूर होऊन आला नसल्याने, बांधकाम परवाने देण्याचा प्राधिकरणासमोर प्रश्न उभा आहे; त्यामुळे प्राधिकरणातील गावे आणि शहरी भागांतील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

स्थापनेपासून एकही रुपयाचा निधी शासनाकडून या प्राधिकरणाला मिळालेला नाही. बांधकाम परवाने प्रलंबित आहेत. प्राधिकरणामुळे ग्रामीण भागातील अडचणी वाढणार असल्याने त्याला ३० हून अधिक गावांचा विरोध आहे. त्याबाबतचे ठराव समितीकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच प्राधिकरणाविरोधातील लढा तीव्र केला जाणार आहे.- राजू सूर्यवंशी, अध्यक्ष, प्राधिकरण विरोधी कृती समिती

प्राधिकरणाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. निधी नसल्याने प्राधिकरण यशस्वी होईल, असे वाटत नाही; त्यामुळे त्याला गावांचा विरोध आहे. प्राधिकरणातील गावांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी बैठक आयोजित केली आहे.- अशोक पाटील-शिंगणापूरकर

पुढील आठवड्यात बैठकीची शक्यताप्राधिकरणाचे कामकाज सुरू आहे. बांधकाम परवाने दिले जात आहे. विकासकामांच्या प्रारंभाचे नियोजन करण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता असल्याचे कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी मंगळवारी सांगितले.प्राधिकरणाची वाटचाल

  • ३० आॅगस्ट २०१६ : कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घोषणा
  •  १६ आॅगस्ट २०१७ : प्राधिकरणाची स्थापना
  • ९ फेबु्रवारी २०१८ : कोल्हापूरमध्ये अधिकृत कार्यालय सुरू, मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती
  •  ८ मार्च २०१८ : ग्रामीण भागातील बांधकाम परवाने प्राधिकरणामार्फत देण्याची घोषणा
  • १८ मार्च २०१८ : समिती नियुक्ती व पहिली बैठक घेण्यात आली.
  •  २५ मे २०१८ : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
  • २४ जुलै २०१८ : शिवसेनेचे प्राधिकरणाच्या कार्यालयात टाळेठोक आंदोलन
  •  १ आॅगस्ट २०१८ : प्राधिकरणाची बैठक सरपंचांनी उधळली
  •  ३ सप्टेंबर २०१८ : ४२ गावांनी घेतली प्राधिकरण नको भूमिका
  • ११ आॅक्टोबर २०१८ : पालकमंत्री यांनी केली कृती समितीसमवेत चर्चा
  • ६ डिसेंबर २०१८ : प्राधिकरणाविरोधात लढा देण्याचा कृती समितीचा निर्धार

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर