शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

लेखापरीक्षकांची आॅडीट फीसाठीची तडजोड दुर्देवी : अरुण काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 17:04 IST

कोल्हापूर : कमी रकमेत लेखापरीक्षण करुन देण्यात कांही लेखापरीक्षक आघाडीवर आहेत, पण त्यामुळे कामाचा दर्जाही खालावत चालला आहे आणि ...

ठळक मुद्देलेखापरीक्षकांची आॅडीट फीसाठीची तडजोड दुर्देवी : अरुण काकडे लेखापरीक्षकांच्या बैठकीत टोचले कान

कोल्हापूर: कमी रकमेत लेखापरीक्षण करुन देण्यात कांही लेखापरीक्षक आघाडीवर आहेत, पण त्यामुळे कामाचा दर्जाही खालावत चालला आहे आणि शासनाचा महसूलही बुडत आहे. विशेषता नव्यानेच या क्षेत्रात आलेलेच अशी पाउले उचलताना दिसत आहेत. आॅडीटसाठी अशाप्रकारे तडजोड करणे दुर्देवी आहे, अशा शब्दात जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी लेखापरीक्षकांचे कान उपटले. आता लोकही सजग झाले आहेत, त्यामुळे येथून पुढे तरी जबाबदारीचे भान ठेवूनच काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.जिल्हा प्रमाणित लेखापरीक्षक असोसिएशनचा मेळावा मंगळवारी दुपारी शाहू मिनी सभागृहात झाला. अटल पणन योजनेत पुरस्कार मिळाल्याबद्दल असोसिएनतर्फे उपनिबंधक अरुण काकडे यांचा सत्कार झाला. निवृत्त उपनिबंधक दिनेश ओउळकर, सहनिबंधक गजेंद्र देशमुख, असोसिएशनचे माने, भोसले प्रमुख उपस्थित होते.लेखापरीक्षकांना आपल्या खास शैलीत सुनावताना अरुण काकडे म्हणाले. जुन्या लोकांना यातील खाचाखोचा माहित आहेत, पण अलीकडे नव्याने या क्षेत्रात आलेले वाटेल तशा तडजोडी करताना धन्यता मानत आहे. शासनाच्या प्रमाणित फी ८0 हजार असताना त्याऐवजी ३0 हजार घेउन कामांचा उरक केला जात आहे. सहकारातील गुणवत्तेला हे मारक आहे. असे प्रकार करुन फौजदारीसारख्या नसत्या फेऱ्यात अडकू नका.

दोष दुरुस्ती अहवाल तात्काळ करुन घ्या. करत आहोत असे म्हणण्यापेक्षा समजून घेउन ते करण्यावर भर द्या. आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूका असल्याने त्याआधीच ही सर्व कामे पूर्ण करण्यावर भर द्या. अपहार आहे त्या ठिकाणी कठोर व्हा. संस्थाचालकांना विश्वासात घेउन काम करा. तुमच्या एका चुकीमुळे कुणी निवडणूकीसाठी अपात्र ठरु नये याची आतापासूनच दक्षता घ्यावी, असेही ककडे यांनी सांगितले.निवृत्त उपनिबंधक दिनेश ओउळकर म्हणाले, लेखापरीक्षक हे सहकार चळवळीत मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. महाराष्ट्रातील सहकार चळवळ व कायदे देशात प्र्रगत मानले जातात. आपले अनुकरण इतर राज्ये करतात. सहकाराचा गाभा लोकशाही आहे, ती टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पkolhapurकोल्हापूर