शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

‘गडहिंग्लज’च्या संचालकांच्या भूमिकेकडेच लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST

राम मगदूम। गडहिंग्लज आठवडाभरात आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना संचालकांच्या ताब्यात येईल. त्यामुळे त्यांनी आपसातील मतभेद आणि ...

राम मगदूम। गडहिंग्लज

आठवडाभरात आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना संचालकांच्या ताब्यात येईल. त्यामुळे त्यांनी आपसातील मतभेद आणि अंतर्गत गटबाजीला मूठमाती देऊन कारखान्याच्या भवितव्यासाठी एकत्र यावे, हीच ऊसकरी शेतकरी, सभासद व कामगारांची अपेक्षा आहे. म्हणूनच आता संचालकांच्या भूमिकेकडेच सर्वांचे लक्ष आहे.

१० एप्रिलपर्यंत कारखान्याचा ताबा संचालकांकडे देण्याच्या सहकार खात्याच्या आदेशामुळे ‘ब्रिस्क’ कंपनी जाणार आणि कारखाना संचालकांच्या ताब्यात येणार, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे.

त्यानंतर कारखाना सुरळीत चालू ठेवण्यासंदर्भात संचालक कोणती भूमिका घेणार, त्यावरच येत्या गळीत हंगामात कारखान्याचे ‘चाक’ फिरणार की नाही, हे अवलंबून आहे.

गडहिंग्लज विभागातील ‘दौलत’ आणि आजऱ्याची परिस्थिती विचारात घेता, आपला कारखाना यापुढे सुरळीत चालू ठेवण्याचे खरे आव्हान विद्यमान संचालकांसमोर आहे. त्यामुळे कारखाना स्वबळावर चालविण्यासाठी किंवा चालवायला देण्याच्या निर्णयासाठी त्यांच्यात ‘एकमत’ होण्याची गरज आहे.

तथापि, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने आलेल्या ‘ब्रिस्क’ने कालबाह्य मशिनरी आणि पोषक वातावरणाच्या अभावाचे कारण पुढे करून मुदतीपूर्वीच कारखाना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील कुपेकर व मुश्रीफ समर्थक संचालक काय करणार, हे पाहावे लागेल.

तसेच पूर्वेतिहास विचारात घेता, कारखान्यात विद्यमान अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे व माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांचे कधीच जमलेले नाही. त्यामुळे शिंदेंच्या भूमिकेला विरोधी आघाडीतील शहापूरकर गटाचा पाठिंबा मिळेल, असे सध्या तरी दिसत नाही.

याउलट, ‘ब्रिस्क’कडे कारखाना चालवायला देण्यासाठी सहकार्य केलेल्या तत्कालीन १५ संचालकांना गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे दुखावलेले विरोधी आघाडीचे प्रमुख माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण हे आता विद्यमान अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांच्या विचारांशी ‘सहमत’ झाल्याची चर्चा आहे.

३० मार्च, २०२१ रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली आहे. परंतु, कोरोनामुळे जूनपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे कारखान्याच्या भवितव्याचा निर्णय विद्यमान संचालकांनाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी एकजुटीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे. किंबहुना, त्यावरच कारखान्याचे भवितव्य अवलंबून आहे.

---------------------------------------

* कारखान्यातील बलाबल असे :

सत्ताधारी आघाडी- १० (कुपेकर-मुश्रीफ ५, शिंदे-३, नलवडे-२)

* विरोधी आघाडी : ८ (प्रकाश चव्हाण गट - ५, शहापूरकर गट -३)

---------------------------------------