शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हानिहाय कामांचा आराखडा करण्याचा प्रयत्न : योगेश जाधव यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 19:06 IST

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र सतरा जिल्ह्यांचे आहे. या जिल्ह्यांमध्ये आताही विविध कामे सुरू आहेत; म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या दोन कामांचा जिल्हानिहाय आराखडा तयार करून ती कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही या महामंडळाचे नूतन अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देयोगेश जाधव यांची ग्वाही : ‘लोकमत’कडून सहकार्याची अपेक्षा ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट

कोल्हापूर : उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र सतरा जिल्ह्यांचे आहे. या जिल्ह्यांमध्ये आताही विविध कामे सुरू आहेत; म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या दोन कामांचा जिल्हानिहाय आराखडा तयार करून ती कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही या महामंडळाचे नूतन अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांनी दिली.महामंडळाचे अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. महामंडळाचे काम करताना मला कायमच ‘लोकमत’कडून सहकार्य लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संपादक वसंत भोसले यांनी या महामंडळाची रचना, उद्देश सांगितला. कोल्हापूरला जाधव यांच्या निमित्ताने या महामंडळावर काम करण्याची प्रथमच संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.जाधव म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन कामाचा आराखडा निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. त्याच त्याच स्वरूपाची कामे करण्यापेक्षा आरोग्य, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील काही वेगळ्या धाटणीची कामे करण्यावर आपला भर राहील.

या महामंडळासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याने निधीची अडचण असणार नाही. या महामंडळाचा अध्यक्ष हा जिल्हा नियोजन मंडळाचाही पदसिद्ध सदस्य असतो. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांनाही उपस्थित राहून त्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावू.’ यावेळी ‘लोकमत’मधील सर्व विभागप्रमुख व बातमीदारांसमवेत त्यांनी सुमारे तासभर संवाद साधला.

शिरोळमधील कॅन्सरचे संशोधनशिरोळ तालुक्यात मुख्यत: कीटकनाशकांचा अतिवापर झाल्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परवाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊनही सरकारचे लक्ष या गंभीर प्रश्नांकडे वळविले आहे. मुंबईतील टाटा कॅन्सर सेंटरच्या मदतीने या तालुक्याचे नव्याने संशोधन करून या प्रश्नाची तीव्रता शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहण्याचा विचार असल्याचे योगेश जाधव यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Lokmatलोकमतkolhapurकोल्हापूर