शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
5
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
6
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
7
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
8
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
9
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
10
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
11
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
12
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
13
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
14
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
15
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
17
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
18
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
19
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
20
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?

मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; तरुणास चोप

By admin | Updated: November 28, 2014 00:31 IST

गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.

कोल्हापूर : अंधाराचा फायदा घेत लक्ष्मीपुरी कोंडा ओळ चौकात खेळत असणाऱ्या दोन शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा, तसेच अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्यपीस काल, बुधवारी नागरिकांनी चोप देत लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. संशयित मिलिंद रवींद्र पोतदार (वय २९, रा. फेजीवडे, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला आज, गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, कोंडा ओळ चौकात सहा व सात वर्षांच्या दोन मुली इतर मुलांसोबत खेळत होत्या. यावेळी मिलिंद दारू पिऊन तेथे आला. त्याने सात वर्षांच्या बालिकेचा हात धरून ‘तू कुठे राहतेस, तुझं गाव कोणतं?’, अशी विचारणा केली. भांबावलेल्या बालिकेने पप्पा आलेत, असे सांगून सुटका करून घेत घर गाठले. तिने हा प्रकार आईला सांगितला. काही वेळाने पुन्हा मिलिंद तेथे आला. दुसऱ्या सहा वर्षांच्या बालिकेला उचलण्याचा प्रयत्न करीत असताना नागरिकांनी त्याला बेदम चोप देत लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सुरुवातीस बालिकेकडे विचारपूस केली. संशयित तरुण दारू पिल्याने माहिती देताना अडखळत बोलत होता. पोलिसांनी त्याचा नेमका काय उद्देश होता, याची खातरजमा केली असता अश्लील चाळे करण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. संबंधित मुलीच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)