शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बहुमताच्या जोरावर नागरिकत्व कायदा लादण्याचा प्रयत्न : सरोदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:06 IST

संविधानातील नागरिकत्वाची तरतूद ही अगोदरच व्यापक असताना, नव्याने बदलाचा घाट का घातला जातो, हे अगोदर लोकांनी समजून घेतले पाहिजे. बहुमताच्या अश्वावर स्वार होऊन नागरिकत्व सुधारणा विधेयक लादण्याचा होत असलेला प्रयत्न भारतीय जनता सहन करणार नाही, असे प्रतिपादन मानवाधिकार कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.

ठळक मुद्देबहुमताच्या जोरावर नागरिकत्व कायदा लादण्याचा प्रयत्न : सरोदे ‘नवीन नागरिकत्व व कायद्याच्या सीमारेषा’ विषयावर ‘खुला संवाद’

कोल्हापूर : संविधानातील नागरिकत्वाची तरतूद ही अगोदरच व्यापक असताना, नव्याने बदलाचा घाट का घातला जातो, हे अगोदर लोकांनी समजून घेतले पाहिजे. बहुमताच्या अश्वावर स्वार होऊन नागरिकत्व सुधारणा विधेयक लादण्याचा होत असलेला प्रयत्न भारतीय जनता सहन करणार नाही, असे प्रतिपादन मानवाधिकार कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.सम्राटनगर येथे ‘वाचनकट्टा’ आणि विजयश्री फौंडेशन यांच्यातर्फे ‘नवीन नागरिकत्व व कायद्याच्या सीमारेषा’ या विषयावर ‘खुला संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विजयश्री फौंडेशनचे अध्यक्ष जॉर्ज क्रूज होते.अ‍ॅड. सरोदे पुढे म्हणाले, आज ज्या तरतुदींचा उल्लेख केला जातो, त्या तरतुदी अगोदरपासूनच १९५५ च्या नागरिकत्व कायद्यात समाविष्ट आहेत. मग धर्मावर आधारित नव्याने कायद्यात बदल करून संपूर्ण देशात अस्थिरता निर्माण करणे हे चुकीचे आहे.

भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द समाविष्ट असताना धर्माच्या आधारावर होणारे वर्गीकरण लोकशाही राष्ट्रासाठी घातक आहे. यासाठी लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. सध्याच्या धर्मसंस्था या भीतीवर आधारित आहेत. याचाच गैरफायदा राजकीय लोक स्वत:च्या फायद्यासाठी करून घेत असतात. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.यावेळी जॉर्ज क्रूज यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘वाचनकट्टा’चे संकल्पक युवराज कदम यांनी स्वागत केले; तर प्रभाकर पाटील यांनी आभार मानले. सचिन लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला नगरसेवक अशोक जाधव, अ‍ॅड. बी. एम. पाटील, ‘वाचनकट्टा’चे संकल्पक युवराज कदम, प्रभाकर पाटील, लखन भोगम, महेश कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Asim Sarodeअसिम सराेदेkolhapurकोल्हापूर