शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

बडोदा बँकेचे एटीएम पळविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 31, 2014 23:36 IST

नागाव फाटा येथील घटना : चौघा चोरट्यांचे कृत्य; पोलिसांबरोबर झटापट

शिरोली : नागाव फाटा (ता. हातकणंगले) येथील बॅँक आॅफ बडोदाचे एटीएम मशीन चौघा चोरट्यांनी पळवण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रयत्न फसला आणि एटीएममधील सुमारे २० लाख रुपयांची रक्कम चोरीला जाण्यापासून वाचली. ही घटना आज, रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. बॅँक आॅफ बडोदाची पुणे-बंगलोर महामार्गालगतच नागाव फाटा येथे शाखा आहे. या शाखेशेजारीच खवरे कॉम्प्लेक्समध्ये एटीएम सेंटर आहे. या एटीएमला सुरक्षारक्षक नाही, हे पाहून चार चोरट्यांनी सुरुवातीस एटीएम गॅसकटरने जाळून फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, एटीएम फुटत नसल्यामुळे पूर्ण मशीनच बरोबर आणलेल्या टेम्पोत भरण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याचवेळी शिरोली पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाला एटीएम सेंटर उघडे दिसल्यामुळे सहायक फौजदार प्रकाश पाटील व पोलीस नाईक सुहास पाटील एटीएम सेंटर पाहण्यासाठी गेले असता चार चोरटे खवरे कॉम्प्लेक्समधून सुमारे २० फूट अंतरावरून ओढत आणलेले एटीएम मशीन सोबत आणलेल्या टेम्पोत चढवीत होते.यावेळी पोलिसांना पाहून पळून जाताना चोरट्यांची प्रकाश पाटील, सुहास पाटील यांच्याबरोबर झटापट झाली. मात्र, याचवेळी टेम्पोचालकाने टेम्पो सुरू केल्याने ते चारही चोरटे आंबेडकर नगरमधून नागावच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर शिरोली पोलिसांनी संपूर्ण नागाव पिंजून काढले; पण चोरटे सापडले नाहीत. सकाळी एटीएम मशीनवरील व घटनास्थळावरील ठसे घेण्यासाठी ठसेतज्ज्ञांचे पथक बोलावले होते.बँक अधिकाऱ्यांनी एटीएममधील रक्कम मोजली असता त्यामध्ये १९ लाख ७६ हजार इतकी रक्कम होती. गेल्या सहा महिन्यांत दोनवेळा बँक आॅफ बडोदाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे; तरीही बॅँकेने सुरक्षेसाठी रक्षक ठेवलेला नाही. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.चौघे चोरटे कोल्हापूरचे..एटीएम मशीन फोडण्यासाठी चौघेजण पांढऱ्या रंगाच्या कोल्हापूर पासिंगच्या ४०७ टेम्पोतून आले होते, असे घटनास्थळावरून व पोलिसांनी सांगितले. म्हणजे चोरटे हे कोल्हापूर जिल्ह्यातीलच असण्याची शक्यता आहे. टेम्पोचा नंबर सापडला असल्यामुळे चोरटे लवकरच सापडतील, असा विश्वास सहायक पोलीस निरीक्षक के. पी. यादव यांनी व्यक्त केला.