शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दुंडगेत येथे विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न, संशयित तरूणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 12:18 IST

Crimenews, Police, Kolhapurnews दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील नवीन वसाहतीमध्ये माहेरी राहणाऱ्या विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आजूबाजूच्या तरूणांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांनी ताब्यात दिले.

ठळक मुद्देदुंडगेत येथे विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न, संशयित तरूणास अटक नातेवाईकांसह ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील नवीन वसाहतीमध्ये माहेरी राहणाऱ्या विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आजूबाजूच्या तरूणांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांनी ताब्यात दिले.

सुनिल जंबू मादर (मूळगाव बेळवी, ता. हुक्केरी, सध्या रा. दुंडगे, ता. गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव आहे.पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, दुंडगे येथील पिडीत युवतीचे दोन वर्षापूर्वी विवाह झाला आहे. परंतु, कौटुंबिक कारणामुळे ती माहेरीच राहते.मंगळवार (८) सकाळी सव्वाआठच्या सुमारास ती आपल्या घराच्या दारात उभी होती. त्यावेळी सुनिल याने तिला दादा घरात आहे का असे विचारत घरात ओढून नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यामुळे तिची चुलती व चुलत बहिण धावून आले. त्यामुळे सुनिलने तेथून पळ काढला.शेतवडीतून तो गडहिंग्लजच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच परिसरातील तरूणांनी त्याचा पाठलाग करून नेवडेतळानजीक त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, संशयित तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पिडीतेच्या नातेवाईकांसह तरूणांनी पोलिस ठाण्यासमोर कांहीकाळ ठिय्या मांडला होता. माजी आमदार श्रीपतराव शिंदे व बाळेश नाईक यांनीही पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांची भेट घेवून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. संशयित आरोपी सुनिल याने दुंडगे येथे नवीन वसाहतीमध्ये वाहनांच्या पेटींगचा व्यवसाय सुरू केला आहे. आई-वडीलांसह तो आपल्या नातेवाईकांच्या घरी राहतो. यापूर्वी त्याने हुबळी येथेही असाच प्रकार केल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू होती. दुंडगेतील तरूणांचे धाडसपाठलाग करून पकडायला येणाऱ्या तरूणांवर दगडफेक करून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही आरोपीने केला. परंतु, धाडसाने तरूणांनी त्याला पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस