शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिवाजी विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न फसला, फायर वॉलमुळे धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:03 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) हॅक करण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारी झाला. फायर वॉलमुळे हॅकर्सचा प्रयत्न फसला. कुलगुरू ...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) हॅक करण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारी झाला. फायर वॉलमुळे हॅकर्सचा प्रयत्न फसला. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी तत्काळ दखल घेत सुरक्षेचे आढावा घेतला.विद्यापीठाची वेबसाइट गेल्या काही महिन्यांपूर्वी हॅक करून त्यावरील वॉटरमार्कसह इतर गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन वेबसाइटच्या सुरक्षेसाठी चोख उपाययोजना केल्या. मात्र गुरुवारी पुन्हा विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न हॅकर्सने केला. गुगल सर्च इंजीनद्वारे शिवाजी विद्यापीठाची वेबसाइट शोधणाऱ्या व्यक्तींना ‘ही साइट हॅक झाली असण्याची शक्यता आहे,’ अशा स्वरूपाचा संदेश दुपारपासून दिसत होता. बिंग, डकडकगो आदी अन्य सर्च इंजीनवर असा संदेश दिसत नव्हता.तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संगणक केंद्रामार्फत फायरवॉल सुरक्षेची तपासणी केली असता काही पृष्ठे हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. या पृष्ठांबाबत खबरदारी घेतली आहे. तसेच गुगल सर्च इंजीनला कळविले आहे. दरम्यान, शिवाजी विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्याचा झालेला प्रयत्न फायरवॉलमुळे असफल ठरला आहे. विद्यापीठाची वेबसाइट सुरक्षित आहे, असे संगणक केंद्राचे संचालक अभिजित रेडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठcyber crimeसायबर क्राइम