शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

‘स्मार्ट सिटी’मध्ये कोल्हापूरचा समावेश होण्यासाठी प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:27 IST

स्मार्ट सिटीमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावेत. रेल्वे, विमानतळ, आदींबाबतचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी क्रिडाई कोल्हापूर संघटनेने खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे मंगळवारी केली. कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने आम्ही तिघे खासदार लक्ष देणार आहोत. बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी या केंद्र आणि राज्य सरकारसमोर मांडणार असल्याची ग्वाही खासदार मंडलिक यांनी यावेळी दिली.

ठळक मुद्दे‘स्मार्ट सिटी’मध्ये कोल्हापूरचा समावेश होण्यासाठी प्रयत्न व्हावेत‘क्रिडाई कोल्हापूर’ची मागणी; संजय मंडलिक यांचा सत्कार

कोल्हापूर : स्मार्ट सिटीमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावेत. रेल्वे, विमानतळ, आदींबाबतचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी क्रिडाई कोल्हापूर संघटनेने खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे मंगळवारी केली. कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने आम्ही तिघे खासदार लक्ष देणार आहोत. बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी या केंद्र आणि राज्य सरकारसमोर मांडणार असल्याची ग्वाही खासदार मंडलिक यांनी यावेळी दिली.क्रिडाई कोल्हापूरच्या मासिक सभेत ज्येष्ठ सदस्य बाळ पाटणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा देऊन खासदार प्रा. मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष राजीव परीख, ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर प्रमुख उपस्थित होते.

खासदार मंडलिक म्हणाले, विमानसेवेच्या माध्यमातून कोल्हापूर हे देशातील विविध शहरांशी जोडणे; रेल्वे, स्मार्ट सिटी, पर्यटन, खंडपीठ या बाबतींत लवकरच लक्ष घालून त्यांतील अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. कोल्हापूर स्मार्ट सिटी झाली, तर त्यातील अनेक प्रश्न सुटतील.ज्येष्ठ सदस्य पाटणकर म्हणाले, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि माझे घनिष्ठ संबंध होते. त्यांचे नेतृत्व झुंझार, अन्याय सहन न होणारे होते. त्याचा वारसा खासदार प्रा. मंडलिक पुढे नेतील असा मला विश्वास आहे. ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष बेडेकर म्हणाले, कोल्हापूरचा डीपी प्लॅन अद्याप झाला नसल्याने विकासात अडथळा येत आहे.

दिल्लीमध्ये फेब्रुवारीमध्ये ‘क्रिडाई नॅशनल’ने परिषद घेतली. देशातील बांधकाम व्यावसायिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधता यावा, यासाठी ही परिषद घेण्यात आली. त्यामध्ये आम्ही कोल्हापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्याचे मत मांडले. यावेळी त्यांनी कोल्हापूर, नाशिक आणि डहाणू या शहरांचा समावेश करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कोल्हापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यासाठी आपण लक्ष घालावे.

‘क्रिडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष परीख यांनी रेरा कायदा, जीएसटी, परवडणारी घरे यांबाबतचे अनेक प्रश्न मांडले. कोल्हापूरमधून सध्या तीन खासदारांची शक्ती आहे. बांधकाम व्यावसायिकांची निवेदने त्यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचविली जातील. या कार्यक्रमास ‘क्रिडाई कोल्हापूर’चे माजी अध्यक्ष महेश यादव, सचिव रविकिशोर माने, सहसचिव विक्रांत जाधव, गौतम परमार, खजानिस सचिन ओसवाल, सहखजानिस प्रदीप भारमल, राजेश आडके, आदी उपस्थित होते.

कृती समितीला मी सांगणारआंदोलन करण्याऐवजी एकत्र मिळून कसे प्रश्न सोडविले जातील, याबाबत मी कोल्हापूरच्या कृती समितीला सांगणार आहे. सध्या आलेल्या युनिफाईड बायलॉज, जादा एफएसआय यांसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Mandalikसंजय मंडलिकkolhapurकोल्हापूर