शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पोलीस ठाण्यावर हल्ला

By admin | Updated: August 24, 2014 01:30 IST

संशयित आरोपीच्या मृत्यूनंतर उद्रेक : पेठवडगावात प्रचंड तणाव

पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोपपोलीस ठाण्यावर दगडफेक,गाड्यांची तोडफोडशहरातही ठिकठिकाणी दगडफेकीच्या घटनाअप्पर पोलीस अधीक्षक,चार पोलीस जखमीसहायक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस निलंबित संजीव पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवा : मागणीपेठवडगाव : केएमटीवर दगडफेक केल्याप्रकरणी अटक केलेल्या जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार (वय २९, रा. सिद्धार्थनगर, वडगाव) या संशयित आरोपीचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईक आणि जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला चढविला. जोरदार दगडफेक करीत परिसरातील गाड्यांची तोडफोडही केली. शहरातही ठिकठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. या दगडफेकीत अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस व्हॅन व पोलिसांच्या दुचाकीसह अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे, तर अप्पर पोलीस अधीक्षकांसह चार पोलीस दगडफेकीत जखमी झाले. यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांच्यासह दोन पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिले आहेत.घटनास्थळी व पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी : पेठवडगाव येथे दोन गटांतील मारामारी प्रकारानंतर आज, शनिवारी केएमटीवर दगडफेक करणाऱ्या सनी ऊर्फ जगदीश प्रकाश पोवार याला पोलिसांनी दुपारी अटक केली. त्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यास पोलीस कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.सनी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याच्या संशयावरून ५० ते ६० जणांच्या जमावाने सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पेठवडगाव पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर वडगाव शहरात अघोषित बंद पाळण्यात आला. शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.काल, शुक्रवारी महालक्ष्मी यात्रा होती. येथून दर्शन घेऊन अजय ढाले, समीर पोवार, सुशांत कराडे परत येत होते. यावेळी हे तिघेजण रेणुका मंदिराजवळ आले असता त्यांना अज्ञात बुरखाधारकांच्या ३० ते ३५ जणांच्या गटाने मारहाण केली. संबंधित दोषींवर कारवाई करावी यासाठी सिद्धार्थनगरातील जमावाचे शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात आले. त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रकाश घार्गे यांच्याकडे संबंधितांवर कारवाईची मागणी केली. त्यांनीही कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्वांच्या वतीने विरोधी गटाच्या दोषींवर कारवाई करण्यासाठी निवेदन द्यावे, असे सुचविले.आज विरोधी गटातील युवकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. १९) झालेल्या मारहाणीची तक्रार दिली. दरम्यान, दोषींवर पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे सिद्धार्थनगरातील कार्यकर्ते संतप्त झाले. ते सर्वजण डॉ. आंबेडकर चौकाजवळ एकत्र आले. येथे सनी पोवार हा केएमटी बसवर दगडफेक करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यास पकडले. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक बबन शिंदे यांनी यासंबंधी फिर्याद दिली होती. पोलिसांनी सनी यास सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अटक केली. यावेळी सनी याच्या पोटात दुखत असल्यामुळे उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.आज दुपारी चार वाजता दोन्ही गटांची शांतता बैठक सुरू होती. तसेच सायंकाळी पाच वाजता गणराया पुरस्काराचे वितरण असा कार्यक्रम होता. या मृत्यूमुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला.सनी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचा संशय सिद्धार्थनगरातील नागरिकांच्यात पसरला. याबाबत त्यांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. यामध्ये महिलाही आघाडीवर होत्या. जमावाने पोलीस ठाण्याकडे जाऊन जाब विचारण्याचा निर्णय घेतला. या सर्वांनी रस्त्यावर येताना विरोधी गटाच्या काही दुकानांवर हल्ला केला. तसेच येणाऱ्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. संतप्त जमाव साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यावर चाल करून आला. त्यांनी पोलीस ठाण्याजवळ असणाऱ्या दोन ट्रकवरही दगडफेक केली. तसेच त्यांनी पोलीस ठाण्यावरील बोर्ड, खिडक्या, दरवाजे, परिसरातील वाहने, पोलीस व्हॅन, गुन्ह्यातील जप्त वाहने यांवर प्रचंड दगडफेक केली. तसेच पोलिसांची टाटा सुमो गाडीही उलटवली. सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे हा धुमाकूळ सुरू होता. यावेळी पोलीस ठाण्याच्या मुख्य दरवाजा पोलिसांनी कुलूप लावून बंद केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. घटनास्थळी आमदार डॉ. सुजित मिणचेकरही होते. दरम्यान, जमाव येथून पुन्हा सिद्धार्थनगरकडे गेला.याप्रकरणी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांना सिद्धार्थनगरात येण्याचे आवाहन केले. त्यास शर्मा यांनीही प्रतिसाद दिला. हे दोघेजण बंदोबस्ताशिवाय सिद्धार्थनगरातील बौद्धविहाराकडे गेले. दोघांनी संतप्त नागरिकांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला. यावेळी दोषींना नागरिक तसेच दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमदार मिणचेकर व शर्मा पोलीस ठाण्यात आले. दरम्यान, सिद्धार्थनगरातील कार्यकर्ते पद्मा रोडवरून दुकानावर दगडफेक करीत शिवाजी चौकात पोहोचले. येथील काही दुकाने, घरे, मोटारसायकल, कार यांच्यावर दगडफेक केली. काहीजणांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांची सशस्त्र पथके शहरात तैनात करण्यात आली. वडगावातील पालिका चौकात परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत संचारबंदीसदृश वातावरण होते.या तोडफोडीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, याप्रकरणी पोलिसांचे माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)पोलीस अधीक्षक, मिणचेकर यांचे सलोख्यासाठी प्रयत्नदोन गटांतील संघर्ष पेटून सामाजिक परिस्थिती बिघडू नये, याकरिता पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी सिद्धार्थनगरातील बौद्ध विहार येथे प्रयत्न केले. पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यावर येथील जनता ठाम राहिली. यामध्ये महिलांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. दोघांनी सलोख्यासाठी केलेले प्रयत्न असफल ठरले.दोषींवर कारवाई करू : जिल्हा पोलीस अधीक्षक४जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी घटनास्थळी सायंकाळी सात वाजता भेट दिली.४रात्री आठ वाजता वडगाव पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक शर्मा व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात बैठक झाली. ४या बैठकीत भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष माने व वैभव कांबळे यांनी वडगावचे सहायक पोलिस निरीक्षक संजीव पाटील यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. संजीव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली.४पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले, मृत सनी पोवार याच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या प्रकरणाची सीआयडी चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल.४दोन गटांत व दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे वातावरण कुणीही निर्माण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.अलीकडच्या काळातील तिसरा प्रकारगुन्ह्यातील संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातील तीनजणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये भादोले, बुवाचे वाठार येथील दोघांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्या केली, तर आज, शनिवारी उपचारासाठी नेत असताना सनी पोवार याचा मृत्यू झाला. यामध्ये दोन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना याचा फटका बसल्याची चर्चा पोलिसांत सुरू होती.