याबाबत अधिक माहिती अशी, सडोली खालसा येथील शेतकरी रामदास पवार-पाटील यांच्या शेतात कांडगाव (ता. करवीर) येथील कृष्णात सुऱ्याप्पा लांडगे यांचा मेंढ्यांचा कळप बसविला होता. रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान तरस सदृश्य प्राण्याने कळपावर हल्ला केला. ज्यामध्ये दहा मेंढ्या ठार झाल्या असून त्यात सहा नर व चार मादी जातीच्या मेंढ्या होत्या.ज्यामध्ये मेंढपाळाचे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित घटनेची माहिती कृष्णात लांडगे यांचे चिरंजीव संदीप यांनी यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांना फोनवरून दिली. त्यांनी करवीर वनपाल विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला.
वनपाल व पशुसंवर्धन अधिकारी यांनी सकाळी दहा वाजता संबंधित घटनेचा पंचनामा केला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे युवराज शेट्टी, वनरक्षक ऋकेज मुल्लाणी, वनसेवक गजानन मगदूम, पोलीस पाटील पंकजकुमार पवार पाटील, तलाठी प्रकाश आढावकर, ग्रामसेवक पी. एस. भोपळे, एकनाथ पाटील, सदस्य संजय पाटील, विशाल गायकवाड, संगीता राजेंद्र मगदूम आदी उपस्थित होते.