शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मेकर ग्रुपच्या ११ कोटी रुपयांच्या पाच मालमत्ता जप्त करा, उच्च न्यायालयाचे आदेश 

By विश्वास पाटील | Updated: December 22, 2023 15:49 IST

करवीर प्रांताधिकारी यांची सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्ती 

कोल्हापूर : मेकर ग्रुप फसवणूक प्रकरणी उच्च न्यायालयाने कंपनीच्या ५ स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश शुक्रवारी दिले.  त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्यावतीने गृह खात्याच्या प्रधान सचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून एकूण  ११ कोटी रुपयाच्या  ५ स्थावर मालमत्ता तसेच संचालक व कंपनीची बँक खाती गोठवण्यात आल्याची व करवीर उपविभागीय अधिकारी यांना सक्षम प्राधिकरण म्हणून नेमण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गुंतवणूकदार कायद्याप्रमाणे विकण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. मेकर ग्रुप या कंपनीने कोल्हापूर व परिसरात सुमारे २०० कोटी रुपयाची गुंतवणूक लोकांकडून गोळा केली व मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले. परंतु अशी कोणतेही आश्वासनाची पूर्तता कंपनीने अथवा त्यांच्या संचालकानी केली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांतर्फे संजय दुर्गे व इतर गुंतवणूकदारांनी फिर्याद दाखल केली. त्यावर महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा डिसेंबर २०१८ मध्ये दाखल केला व त्याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. परंतु कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे संजय दुर्गे व इतर गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन रिट याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे वकील धैर्यशील सुतार यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी २०२१ मध्ये प्रस्ताव पाठवून सुद्धा कंपनीच्या व संचालकांच्या ५ स्थावर मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना राज्य शासनाच्या गृह खात्याने काढली नसल्याचे न्यायालयास सांगितले. त्यावर न्या. अजय गडकरी व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने गृह खात्याच्या प्रधान सचिवांना काय कारवाई केली याची माहिती प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रधान सचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या प्रस्तावाप्रमाणे ५ स्थावर मालमत्ता व सर्व बँक खाती जप्त करण्याची अधिसूचना काढली आहे व करवीर उपविभागीय अधिकारी यांना सक्षम प्राधिकरण म्हणून नेमले असल्याची माहिती दिली.  त्यानुसार नोंद घेऊन गुंतवणूकदारांची याचिका निकाली काढली. यामुळे या मालमत्ता विक्री व इतर प्रक्रिया गतिमान होऊन, गुंतणूकदारांची गुंतवणूक परत मिळणेची आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीHigh Courtउच्च न्यायालय