शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिये येथे बिबट्याने रेडकू फाडून खाल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 18:39 IST

शिये (तालुका करवीर)  येथे बिबट्याने बुधवारी (दि.५) रोजी रात्री बुगले मळा येथील संजय मगदूम या शेतकऱ्याची रेडीवर हल्ला करून अक्षरशः फाडून खाल्ली.

सतिश पाटील, शिरोली :

शिये (तालुका करवीर)  येथे बिबट्याने बुधवारी (दि.५) रोजी रात्री बुगले मळा येथील संजय मगदूम या शेतकऱ्याची रेडीवर हल्ला करून अक्षरशः फाडून खाल्ली.

तासगाव मध्ये बिबट्याला जेरबंद केले तर शियेत बिबट्या मोकाट फिरत आहे. याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.गेल्याच आठवड्यात २६ मार्चला रात्री आठच्या सुमारास बिबट्या जठारवाडी हद्दीतून शिये गावच्या हद्दीत मोटरसायकल समोरुनच धूम ठोकून गेला होता. यावेळी मोटारसायकल चालकाने ब्रेक दाबल्याने बिबट्या निसटून गेला अन्यथा बिबट्या गाडीला धडकत होता.

गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या सादळे मादळे, शिये, कासारवाडी, गिरोली, जठारवाडी, भुये या परिसरातील जंगलात वास्तव्यास आहे.बुधवारी रात्री शिये येथील बुगले मळ्यातील  संजय मगदूम या शेतकऱ्याच्या  रेडीवर हल्ला करून अक्षरशः फाडून खाल्ली. 

हा बिबट्या कामावरून घरी जाणाऱ्या लोकांना, प्रवाशांना, शेतकऱ्यांना दिसतो, बिबट्याचा जरी अधिवास नसला तरी हा जंगल परिसर आहे. याठिकाणी घनदाट झाडी आहे. विसावा घ्यायला आणि लपायला डोंगर असल्याने मोठे दगड आहेत. रानडूक्कर, मोर, लांडोर, भटकी कुत्री असे मुबलक जंगली प्राण्यांचे खाद्य बिबट्याला मिळते. पाण्याची सोय आहे स्वच्छंद फिरायला जागा आहे कुणाचा त्रास नाही यामुळे या भागात बिबट्याने आपला मुक्काम केला आहे. तो जंगल अधिवासात जातच नाही. पण यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी पाजण्यासाठी जाणारे शेतकरी, प्रवासी, कर्मचारी यांना धोका होवू शकतो.

तासगाव मध्ये बिबट्याला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले तर शियेत मात्र  बिबट्या मोकाट फिरत आहे. याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करत आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून शिये परिसरात बिबट्याचा वावर आहे. या बिबट्याने बुधवारी म्हैसीच्या रेडकावर हल्ला करून त्याला ठार मारले. वनविभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना