शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी कोल्हापुरातील खगोलप्रेमी केरळकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 16:06 IST

कंकणाकृती सूर्यग्रहण उद्या, गुरुवारी सकाळी दिसणार आहे. यापुढील अशी संधी नऊ वर्षांनीच मिळणार असल्यामुळे कोल्हापुरातील खगोलप्रेमी या वर्षीचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी थेट केरळकडे रवाना झाले आहेत.

ठळक मुद्देकुतूहल फौंडेशन, चिल्लर पार्टीचा समावेश शिवाजी विद्यापीठात खंडग्रास पाहण्याची संधी

संदीप आडनाईक कोल्हापूर : कंकणाकृती सूर्यग्रहण उद्या, गुरुवारी सकाळी दिसणार आहे. यापुढील अशी संधी नऊ वर्षांनीच मिळणार असल्यामुळे कोल्हापुरातील खगोलप्रेमी या वर्षीचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी थेट केरळकडे रवाना झाले आहेत.कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची ही अनोखी संधी आहे. यासाठी कोल्हापुरातील कुतूहल फौंडेशन, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, मुंबईच्या खगोल मंडळामार्फत डॉ. राजेंद्र भस्मे आणि त्यांचे सहा सहकारी तसेच किरण गवळी यांचा समूहही शक्तिशाली दुर्बिणीसह केरळकडे रवाना झाला आहे. याशिवाय खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठानेही व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.कुतूहल फौंडेशनतर्फे खास चष्मेकोल्हापुरातील कुतूहल फौंडेशनतर्फे सूर्यग्रहणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी डोळ्यांच्या सुरक्षेचा विचार करून वैज्ञानिक पद्धतीने खास चष्मे बनविले आहेत. याशिवाय चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत २४ जणांचा समूह केरळमधील कुन्नूरजवळ सूर्यग्रहण पाहणार आहे. मुंबईच्या खगोल मंडळामार्फत डॉ. राजेंद्र भस्मे आणि समूह केरळजवळील कासारगोडजवळ हे सूर्यग्रहण पाहणार आहेत.शिवाजी विद्यापीठातून ग्रहण पाहण्याची संधीशिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राच्या वतीने स्कूल आॅफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागाच्या छतावरून सूर्यग्रहण पाहण्याची व निरीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी शास्त्रीयदृष्ट्या सूर्यग्रहण कसे पाहावे याचेसुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल; तसेच नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल.

 

  • ठिकाण - कोल्हापूर जिल्हा
  • ग्रहण - कंकणाकृती सूर्यग्रहण
  • प्रारंभ - सकाळी ८.०४ वाजता
  • मध्य - सकाळी ९.२३ वाजता
  • समाप्ती- १०.५९ वाजता
  • एकूण ग्रहण कालावधी - २ तास ५६ मिनिटे

ग्रहणाची सुरुवात सकाळी ८.०४ मिनिटांनी होईल. चंद्राची सावली वरच्या बाजूने सूर्यावर पडण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू खाली सरकेल. सूर्य झाकला जाईल तसतसा अंधार जाणवेल. सकाळी ९.२३ वाजता ८३.५७ टक्के सूर्यबिंब झाकले जाईल. सावली खाली सरकत असताना थोडी उजवीकडे सरकेल आणि १०.५९ वाजता ग्रहण संपेल. ९.२३ नंतर थोडा-थोडा प्रकाश वाढण्यास सुरुवात होईल व १०.५९ नंतर दिवस पूर्ववत होईल.- प्रा. डॉ. अविराज जत्राटकरयशवंतराव पाटील सायन्स कॉलेज, सोळांकूर

सूर्यग्रहण पाहताना विशिष्ट काळजी घ्यावी. थेट सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी किंवा दुर्बीण, भिंगे रंगीत किंवा काजळी लावलेले काचेचे तुकडे, एक्स-रे फिल्म, सीडी आणि गॉगल कॅमेरा, मोबाईल किंवा इतर उपकरणांमधून पाहू नये; कारण एकाग्र सौरकिरणांमुळे डोळ्यांचे नुकसान होईल आणि डोळ्याला गंभीर दुखापत किंवा कायमचे अंधत्व येऊ शकते. ग्रहण पाहण्याकरिता विशिष्ट कागदापासून तयार केलेले सूर्यग्रहण पाहण्याचे चष्मे किंवा फिल्टर वापरावेत. सूर्यग्रहण पाहण्यापूर्वी सूर्यग्रहण पाहण्याचे चष्मे किंवा फिल्टर यांची तपासणी करा आणि जर ते स्क्रॅच किंवा खराब झाले असेल तर फिल्टर वापरू नका.- डॉ. राजीव व्हटकरसमन्वयक,अवकाश संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ.

 

 

 

टॅग्स :KeralaकेरळAstrologyफलज्योतिषkolhapurकोल्हापूर