शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ए,एस.ट्रेडर्स फसवणूक:..तर ईडीकडूनही चौकशी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

By विश्वास पाटील | Updated: December 8, 2023 17:33 IST

'लोकमत'ने हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले

कोल्हापूर : दामदुप्पट लाभाच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ए.एस.ट्रेडर्स कंपनीची गरज पडल्यास मनी लॉड्रिंग्जच्या कायद्यान्वये ईडीमार्फत चौकशी केली जाईल असे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी त्यासंदर्भातील प्रश्र्न उपस्थित केला होता. 'लोकमत'ने हे फसवणूकीचे प्रकरण उघडकीस आणले आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही चर्चेत पूरक प्रश्र्न उपस्थित केला. या फसवणूकीतील मूळ आरोपी परदेशात पळून गेला असल्याची कबूली मंत्री फडणवीस यांनी दिली परंतू त्यास तपासास विलंब लावून संशयितांना विदेशात पळून जाण्यासाठी पोलिस खात्याने मदत केली हा आरोप मात्र त्यांनी फेटाळून लावला. मंत्री फडणवीस म्हणाले, ए.एस.ट्रेडर्स प्रकरणात आतापर्यंत दाखल गुन्ह्यात ३९८ गुंतवणूकदारांची ४९ कोटी ४६ लाखांची फसवणूक झाली आहे. आणि फसवणुकीची व्याप्ती याहून जास्त आहे. ती वेगवेगळ्या राज्यांशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांच्याशी समन्वय साधून या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. तपासात या गुंतवणूकीतील पैसा परदेशात गेला असल्याची वस्तूस्थिती पुढे आलेली नाही. त्यामुळे तशी वस्तूस्थिती असल्यास मनी लॉड्रिंग्ज कायद्यांतर्गत ईडीचीही मदत घेतली जाईल. या प्रकरणात एकूण ३५ आरोपी निष्पण्ण झाले असून त्यापैकी १३ जणांना अटक केली आहे. काही आरोपी विदेशातही पळले आहेत ही वस्तूस्थिती आहे. वेळेचे बंधन असल्याने पहिले दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपास जसा पुढे जाईल तसा अन्य कांही आरोपी निष्पण्ण झाल्यास त्याचा समावेश पुरवणी दोषारोपपत्रात नक्कीच करु.

डायनॅमिक प्लॅटफॉर्मसाठी निविदा : फडणवीस

देशातील अनेक राज्यात अशाप्रकारच्या फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केंद्र सरकारही आयटी ॲक्टमध्ये बदल करत आहे. अशी फसवणूक रोखणारे एक डायनॅमिक प्लॅटफॉर्म राज्य शासन तयार करत आहे. त्याच्या निविदाही सरकारने काढल्या आहेत त्याला जगभरातून चांगल्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. हा प्लॅटफार्म सर्व प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार करेल असे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस