शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘आशां’ ‘कर्मचाऱ्यांची पुन्हा थट्टा : मानधनात अवघी हजार रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:05 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाºया आशा कर्मचाºयांना दिल्या जाणाºया मोबदल्यात केंद्र सरकारने एक हजार रुपयांची वाढ केली. २००९ नंतर ही पहिल्यांदाच वाढ झाली आहे. आशा कर्मचाºयांना यापूर्वी एक हजार रुपये मोबदला मिळत होता.

ठळक मुद्देकेंद्र सरकारकडून नऊ वर्षांनंतर वाढीचा निर्णयलसीकरण, व्ही.एच.एन.एस.सी. सभा, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील मासिक सभा यांत कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही.

नसीम सनदी ।कोल्हापूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाºया आशा कर्मचाºयांना दिल्या जाणाºया मोबदल्यात केंद्र सरकारने एक हजार रुपयांची वाढ केली. २००९ नंतर ही पहिल्यांदाच वाढ झाली आहे. आशा कर्मचाºयांना यापूर्वी एक हजार रुपये मोबदला मिळत होता. आता तो दोन हजार रुपये मिळणार आहे.

किमान वेतनाच्या मागणीसाठी दिल्लीपर्यंत संघर्ष करणाºया ‘आशां’ना नऊ वर्षांनी केवळ एक हजाराची तुटपुंजी वाढ मिळाल्याने सरकारने आपली थट्टा केली असल्याची भावना ‘आशा’ कर्मचाºयांमध्ये वाढीस लागली आहे. वाढीव मोबदल्यातही अनेक अटी लावल्याने एका हाताने देऊन दुसºया हाताने काढून घेण्याचाही प्रकार झाल्याने ‘आशा’ अधिकच व्यथित झाल्या आहेत.

ग्रामीण आरोग्यासाठी लसीकरणापासून ते सर्वेक्षणापर्यंत ७६ प्रकारच्या सेवांचा बोजा शिरावर घेऊन गावोगावी हिंडणाºया ‘आशा’ कर्मचाºयांकडे केंद्र सरकारने कायमच दुर्लक्ष केले आहे.ग्रामीण आरोग्य सेवेचा प्रमुख कणा असणाºया या अत्यल्प मोबदल्यावर दिवसरात्र राबत असतानाही शासनाकडून त्यांची दखल घेतली जात नाही. याविरोधात ‘आशा’ कर्मचाºयांनी वारंवार रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलने केली आहेत, तरीही त्याचा कोणताही परिणाम सरकारवर झालेला नाही.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकडून मानधनात वाढ करीत असल्याचा अध्यादेश ५ आॅक्टोबर २०१८ रोजी काढण्यात आला आहे. या महिन्यापासूनच सुधारित मानधन लागू केले जाईल, असे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सहसंचालक डॉ. दीप्ती पाटील यांनी सर्व जिल्हा परिषदांना कळविले आहे. यात माहितीचे नमुने संकलन व अहवाल सादरीकरणात १०० वरून ३०० याप्रमाणे वाढ केली आहे. लसीकरण, व्ही.एच.एन.एस.सी. सभा, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील मासिक सभा यांत कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. 

वाढ पूर्णपणे फसवीमानधनातील वाढ अत्यल्प असल्याने आम्ही अजिबात समाधानी नाही. रोज १०० रुपये मिळावेत अशी अपेक्षा होती; पण तीही पूर्ण झालेली नाही. मीटिंग भत्त्यात कोणतीही वाढ केलेली नाही. लसीकरण, सर्व्हेसाठीच्या मोबदल्यात दुप्पट वाढ दिसत आहे; पण एका योजनेचे मानधन वाढवून दुसºया योजनेचा मोबदला कमी केल्याने या मानधनवाढीचा लाभ मिळणार नाही. ही वाढ पूर्णपणे फसवी आहे.- नेत्रदीपा पाटील, जिल्हाध्यक्ष आशा कर्मचारी संघटना, कोल्हापूर

टॅग्स :MONEYपैसाkolhapurकोल्हापूर