शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
2
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
3
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
4
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
5
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
6
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त आणि विधी
7
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
8
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया
9
Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण
10
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
11
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
12
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
14
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
15
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
16
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
17
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
18
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
19
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
20
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...

सहायक कामगार आयुक्तांना रस्त्यावरच रोखले -: संभाजी ब्रिगेड माथाडी, जनरल कामगार युनियनचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:26 IST

औद्योगिक क्षेत्रासह सर्वच ठिकाणच्या कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत सोमवारी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनच्यावतीने शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत

ठळक मुद्देसहायक कामगार आयुक्त ए. डी. गुरव यांना घेराव घालत कार्यालयात जाण्यापासून रस्त्यावरच रोखल्याने काहीवेळ तणाव निर्माण आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत आयुक्त गुरव यांनी चर्चा करून कामगारप्रश्नी तोडगा काढण्यासाठी दि. ३० मे रोजी सकाळी पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन दिले.सुमारे अर्धा तास भरउन्हात हा प्रकार सुरू होता.

कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्रासह सर्वच ठिकाणच्या कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत सोमवारी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनच्यावतीने शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले. सहायक कामगार आयुक्त ए. डी. गुरव यांना घेराव घालत कार्यालयात जाण्यापासून रस्त्यावरच रोखल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला.

भर दुपारी उन्हात सुमारे अर्धा तास आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना कामगारप्रश्नी तोडगा काढण्यासाठी ३० मे रोजी बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी गुरव यांनी दिले.गोकुळ शिरगावमधील इंडोकाऊंट व परिसरातील कंपनीतील कामगारांना कामावरून बेकायदेशीर कमी केले जात आहे. दिवाळी सुटीतील कामगारांचा पगार द्यावा, कामगारांच्या कामात ऐनवेळी बदल करून त्यांची हेळसांड केली जाते. खात्यांतर्गत कामगारांची त्रास देण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर चौकशी लावली जात आहे. कामगारांना दमदाटी केली जाते. प्रत्येक कर्मचाऱ्यांना रात्रपाळी सक्तीची केली आहे. याबाबत सहायक कामगार आयुक्तांनी लक्ष घालावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनतर्फे सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले.

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सहायक कामगार आयुक्त ए. डी. गुरव हे बाहेरून कार्यालयासमोर आले. त्यावेळी आंदोलकांनी त्यांना कार्यालयात जाण्यापासून रस्त्यावरच रोखून निदर्शने केली. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. सुमारे अर्धा तास भरउन्हात हा प्रकार सुरू होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी घडवून आणत गुरव यांना कार्यालयात जाणे भाग पाडले. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत आयुक्त गुरव यांनी चर्चा करून कामगारप्रश्नी तोडगा काढण्यासाठी दि. ३० मे रोजी सकाळी पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

आंदोलनाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांच्यासह गिरीष फोंडे यांनी केले. यावेळी भगवान कोर्इंगडे, सुनील जाधव, अभिजित कात्रट, कृष्णात नवघरे, योगेश जगदाळे, अजिंक्य पोवार, प्रवीण जगदाळे, अरुण जकाते, संताजी घोरपडे, बाबू निकम, नामदेव मोरे, प्रकाश पाटील, राजू नाईक, दत्ता पिसाळ, आदी उपस्थित होते.फलकावरील ‘कार्टून’ने वेधले लक्षआंदोलक कामगारांच्या हातातील फलकावर सहायक कामगार आयुक्त यांच्याबाबत कार्टून चित्रे रेखाटली होती. ही चित्रे लक्षवेधी होती. त्याबाबत परिसरात चर्चा सुरू होती.कोल्हापुरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी संभाजी ब्रिगेड माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सहायक कामगार आयुक्त ए. डी. गुरव यांना घेरावो घालून कार्यालयात जाण्यापासून रोखले. दुसºया छायाचित्रात आंदोलक कामगारांनी निदर्शने करून गुरव यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप