शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांत देण्यात येणारी मदत रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:48 IST

Atrocity Act, kolhapur, court, police, Social welfare divisional office दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) अन्यायग्रस्ताला तातडीचा दिलासा म्हणून दिली जाणारी मदत गेल्या सात महिन्यांपासून रखडली आहे. त्यासाठी वर्षाला किमान ५० कोटींचा निधी लागतो परंतू नवे सरकार आल्यापासून ही रक्कम समाजकल्याण विभागाला न मिळाल्याने राज्यभरातील अन्यायग्रस्तांना ही मदत मिळालेली नाही.

ठळक मुद्दे ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांत देण्यात येणारी मदत रखडलीनिधीचा तुटवडा : वर्षाला लागतो किमान ५० कोटींचा निधी

विश्वास पाटीलकोल्हापूर : दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) अन्यायग्रस्ताला तातडीचा दिलासा म्हणून दिली जाणारी मदत गेल्या सात महिन्यांपासून रखडली आहे. त्यासाठी वर्षाला किमान ५० कोटींचा निधी लागतो परंतू नवे सरकार आल्यापासून ही रक्कम समाजकल्याण विभागाला न मिळाल्याने राज्यभरातील अन्यायग्रस्तांना ही मदत मिळालेली नाही.

यावर्षी जानेवारीपासून ऑगस्टअखेर अनूसुचित जाती प्रवर्गातील २१५१ तर अनूसूचित जमातींच्या लोकांवर अन्यायाचे ५६२ खटले राज्यभरांत दाखल झाले आहेत. गेल्या पाच वर्षात असे खटले दाखल होण्याच्या प्रमाणात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.हा गुन्हा दाखल झाल्यावर त्याचा पोलिस ठाण्यांकडून प्रथम माहिती अहवाल समाजकल्याण विभागाकडे पाठविला जातो. तो अहवाल मिळताच संबंधित अन्यायग्रस्ताला तातडीने २५ टक्के रक्कम दिली जाते. या गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यावर आणखी ५० टक्के रक्कम दिली जाते.

फिर्यादीच्याबाजूने निकाल लागल्यास उर्वरित २५ टक्के रक्कम दिली जाते. ही रक्कम देण्यासाठी राज्य स्तरांवर समिती आहे. शिवाय जिल्हास्तरांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून दरमहा बैठक घेवून निधी मंजूर केला जातो. आता बैठक झाली नाही म्हणून मदतनिधी मिळण्यास विलंब लागू नये यासाठी गुन्हा नोंद होताच मदतनिधी देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.गुन्ह्यांचे स्वरुप असे असते..

  • अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तीला अयोग्य पदार्थ खाण्याची-पिण्याची सक्ती
  • जातीय भावनेतून शारीरिक इजा, त्रास देणे, अपमान करणे.
  • नग्न धिंड काढणे,
  • जमिनीचा गैरप्रकारे उपभोग
  • स्वमालकीच्या जमीन व पाणीवापरात अडथळा
  • अनुसूचित जाती व जमातींच्या व्यक्तीच्या विरोधात खोटे गुन्हे
  • सार्वजनिक ठिकाणी अपमान
  • प्रार्थनास्थळे, नदी, विहिरी, पाणवठे अशा ठिकाणी प्रवेश बंदी
  • पिण्याचे पाणी दूषित किंवा घाण करणे.
  • महिलांचा विनयभंग व लैंगिक छळ.
  • घर किंवा गाव सोडून जाण्यास भाग पाडणे.
  •  

गेल्या पाच वर्षांतील दाखल गुन्हे (कंसातील आकडे अनुसूचित जमातींच्या व्यक्तींचे)

  • २०१५-१८१७ (४८७)
  • २०१६-१७५२ (४०३)
  • २०१७-१६८६ (४६७)
  • २०१८-१९७४ (५२७)
  • २०१९-२१५१ (५६२)

अनूसूचित जातींमध्ये विविध पोटजाती : ४८अनूसूचित जमातींमध्ये विविध पोटजाती : ५०

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाkolhapurकोल्हापूरCourtन्यायालयPoliceपोलिसSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय