शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावयास सांगा

By admin | Updated: October 19, 2015 23:56 IST

आजऱ्यात लोकशाहीदिन : आगार व्यवस्थापकांकडे साकडे, राखीव जागावरही अतिक्रमण

आजरा : एस. टी. महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग, गरोदर स्त्रिया यांच्याकरिता एस. टी.मध्ये राखीव जागा ठेवल्या आहेत; परंतु ही सर्व मंडळी एस.टी.मध्ये उभी, तर महाविद्यालयीन तरुण जागा अडवितात. ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा राहू दे, किमान वाहकांना आदराने वागायला सांगा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनीे आगार व्यवस्थापकांकडे केली.आजरा तहसील कार्यालयात तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीदिन झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने एस. टी.मधील आरक्षित जागांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वर्षभरापूर्वी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात शपथ दिली होती; पण प्रत्यक्षात अंमलबजावाणीची गरज उपस्थितांनी बोलून दाखविली.वनविभागाच्यावतीने वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. प्रत्यक्षात किती झाडे जगली, हे मात्र समजू शकत नाही. त्यामुळे वृक्षलागवडीची तपासणी होऊन प्रत्यक्षात वृक्ष जगण्याचे प्रमाण किती आहे, याची तपासणी होण्याची गरज असून, २५ टक्के तरी वृक्ष जगतात का ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. वनखात्याकडून याची माहिती घेतली जाईल, असे तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले.आजरा-महागाव रस्त्यावर आजरा शहराच्या सीमेवर असणाऱ्या चित्री नदीवरील संताजी पुलाची दुरवस्था झाली असून, कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतचे पत्र बांधकाम विभागाला दिले आहे, असे दिनकरराव शिंदे यांनी सांगितले. यावेळी पूल दुरुस्तीकरिता अंदाजपत्रक तयार करून पाठविण्यात आले आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तर अपघात घडल्यावरच तुम्ही लक्ष देणार का? असा प्रश्न तहसीलदारांनी करत किमान पुलाच्या धोकादायकतेबद्दल तेथे फलक तरी लावा. यासाठी बजेट मंजुरीची वाट पाहत बसू नका, अशा शब्दांत सुनावले. वीज वितरण कंपनीकडे दाखल तक्रारींबाबतही मार्गदर्शक सूचना तहसीलदार ठोकडे यांनी केल्या. यावेळी दुय्यम निबंधक, आगार व्यवस्थापक, वीज कंपनीचे अधिकारी, नायब तहसीलदार डी. बी. कोळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)माईकवरून बसस्थानकावर जाहीर कराएस.टी.मधील आरक्षित जागांचा प्रश्न गंभीर असून, माईकवरून पुकारण्याबरोबरच वाहकांना वैयक्तिक सूचना देण्याबरोबरच जे वाहक यांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध थेट तक्रार देण्याचे आवाहन तहसीलदारांसह आगार व्यवस्थापक के. डी. मुरुकटे यांनी केले.नागरिकांनीही जाणीव ठेवावीस्वच्छतेबाबत केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदार न धरता नागरिकांनीही कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.