शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्याकांड साक्षीदारांच्या उलट तपासणी, पुढील सुनावणी १९ डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 16:05 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्यासमोर सुरू आहे. शुक्रवारी साक्षीदार व फिर्यादी आनंद बिद्रे यांची उलट तपासणी पूर्ण होणार होती; परंतु आरोपीचे वकील भानूशाली अनुपस्थित राहिल्याने १९ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे हत्याकांड साक्षीदारांच्या उलट तपासणीपुढील सुनावणी १९ डिसेंबरला

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्यासमोर सुरू आहे. शुक्रवारी साक्षीदार व फिर्यादी आनंद बिद्रे यांची उलट तपासणी पूर्ण होणार होती; परंतु आरोपीचे वकील भानूशाली अनुपस्थित राहिल्याने १९ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.दोन महिन्यांपासून या खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. फिर्यादी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत काम पाहत आहेत. मागील दोन सुनावणीत अश्विनी बिद्रे यांचा भाऊ आनंद बिद्रे यांची साक्ष झाली. सरकारी वकिलांनी ही साक्ष नोंदवून घेतली. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी उलट तपासणीला सुरुवात केली आहे.शुक्रवारी उलट तपासणी पूर्ण होणार होती; परंतु आरोपीचे वकील हजर नव्हते. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. घरत यांनी साक्षीदार आनंद बिद्रे हे चेन्नई येथून साक्ष देण्यासाठी पनवेलला येतात, त्यांना दंड व प्रवासखर्च देण्यात यावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

न्यायालयाने ती मागणी मान्य करून आनंद बिद्रे यांना ८ हजार रुपये प्रवासखर्च देण्याचे आदेश केले. यावेळी तत्कालीन तपास अधिकारी संगीता शिंदे-अल्फान्सो, अजय कदम, अश्विनी यांचे पती राजकुमार गोरे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणCourtन्यायालयkolhapurकोल्हापूर