शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : फळणीकरसह भंडारीचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 2:20 PM

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सहआरोपी महेश फळणीकर व कुंदन भंडारी याचा जामीन अर्ज अलिबाग जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : फळणीकरसह भंडारीचा जामीन फेटाळलाकारागृह बदलाची मागणी, अंतिम निर्णय २ जानेवारीला

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सहआरोपी महेश फळणीकर व कुंदन भंडारी याचा जामीन अर्ज अलिबाग जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी पुढील तारखेची विनंती केली होती. त्यास न्यायालयाने नामंजुरी दिली. दरम्यान, संशयित अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांच्या वस्तू खासगी लॅबकडून तपासणी करून घेऊ नयेत, असा अर्ज केला होता. तोसुद्धा न्यायालयाने फेटाळला.बिद्रे हत्याप्रकरणी बुधवारी अलिबाग जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. राजू गोरे यांनी अश्विनी यांच्या वस्तूंची डीएनए चाचणी खासगी लॅबकडून करून घ्यावी, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे पनवेल न्यायालयाने त्या वस्तू खासगी ‘ट्रथ’ या लॅबकडे वर्ग केल्या आहेत.

त्यांची टेस्ट खासगी लॅबकडून करून घेऊ नये असा अर्ज मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने वकिलामार्फत सत्र न्यायालयात दाखल केला होता. तो अर्जही न्यायाधीश मलशेट्टी यानी फेटाळला असून पनवेल न्यायालयाचा खासगी ट्रथ लॅबमध्ये डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आरोपीने कारागृह बदलाची मागणी केली आहे. त्याची सुनावणी झाली असून त्यावर अंतिम निर्णय २ जानेवारीला होणार आहे. 

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणkolhapurकोल्हापूर