शहरं
Join us  
Trending Stories
1
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
2
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
3
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
4
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
5
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
6
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
7
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
9
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
10
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
11
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
12
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
13
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
14
‘काँग्रेस म्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
15
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
16
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
17
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
18
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
19
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
20
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'

दिवाळीला हातभारः कागलमधील 'आशां'ना मिळाले प्रोत्साहन अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:12 IST

health, ashaworker, kolhapurnews आरोग्य विभागाचा मुख्य कणा बनलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना कागल तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी स्तरावरून दिवाळीसाठी प्रोत्साहन अनुदान देवून त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.

ठळक मुद्देदिवाळीला हातभारः कागलमधील 'आशां'ना मिळाले प्रोत्साहन अनुदान८३ ग्रामपंचायतीकडून वितरण;राज्यातील एकमेव तालुका

दत्ता पाटीलम्हाकवे : आरोग्य विभागाचा मुख्य कणा बनलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना कागल तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी स्तरावरून दिवाळीसाठी प्रोत्साहन अनुदान देवून त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.दोन दिवसापूर्वी सभापती पुनम मगदूम-महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांनी सर्व ग्रामपंचायतीना लेखी आदेश देवून याबाबत आवाहन केले होते.त्याला ग्रामपंचायतीनीही उस्फुर्त प्रतिसाद देत प्रत्येकी दीड हजारापासून तीन हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देवू केले आहे.याबाबत आशांमधून समाधानाचे वातावरण आहे.विशेष बाब म्हणजे आशांच्या योगदानाची दखल घेणारी राज्यातील एकमेव पंचायत समिती ठरली आहे. मानधन मिळेलच याची तमा न बाळगता जीव धोक्यात घालून कोरोना काळात आशांनी घरोघरी जाऊन दररोज सर्व्हे केला.त्यामुळे आरोग्य विभागाला मोलाची मदत झालीतालुक्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी सणानिमित्त दिलेली हि भाऊबीजच असून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.यासाठी सिटूचे जिल्हा सचिव काँ.शिवाजी मगदूम यांनीही पाठपुरावा केला.

"आपल्या जीवासह कुंटुंबाकडे दुर्लक्ष करत आशांनी योगदान दिले आहे.अडचणीच्या काळात ग्रामपंचायत प्रशासनाला गावचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी सहकार्य केले.याबाबत कृतज्ञता राखत ग्रामपंचायतीनीही प्रोत्साहन अनुदान देत आम्हाला भाऊबीजच देवू केली आहे.यापुढेही गावावर येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी आशा पुढे राहतील.उज्ज्वला पाटीलजिल्हासचिव, आशा संघटना

सिध्दनेर्ली'कडून सर्वाधिक तीन हजारसभापती मगदूम यांचे मुळगाव असणाऱ्या सिध्दनेर्ली ग्रामपंचायतीने प्रत्येकी ३ हजार,बाळेगोळ २५००,म्हाकवे२हजार, बामणी यासह तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी उस्फूर्तपणे अनुदान दिले. याबाबत आशां संघटनेने सभापती,सर्व सदस्य,गटविकास अधिकारी यांच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले.

टॅग्स :DiwaliदिवाळीLabourकामगारkolhapurकोल्हापूरkagal-acकागल