शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सांबरांसह भेकरची संख्या वाढविली, आता टप्याटप्याने आणणार वाघ; स्थलांतरणाची प्रक्रिया कशी.. वाचा

By संदीप आडनाईक | Updated: September 13, 2025 19:18 IST

वाघ वाढविण्यासाठी ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’चे नियोजनबद्ध प्रयत्न

संदीप आडनाईक कोल्हापूर : मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ टप्प्याटप्याने दोन महिन्यांपर्यंत सह्याद्री अभयारण्यात स्थलांतर केले जाणार आहेत. वाघांची संख्या वाढावी यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले. राखीव वनजमिनीत शेती करून या वाघांचे खाद्य असलेल्या सांबर, भेकर आदी प्राण्यांची संख्या वाढवली आहे. या प्रकल्पात आता २७ वाघ राहू शकतील इतकी खाद्याची व्यवस्था असल्याचे या प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले.

वाघांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा अधिवास पूरक असल्यामुळे स्थानांतरणासाठी सर्वांत महत्त्वाची बाब असणारी परवानगी मिळाली आहे. ताडोबा आणि पेंच या वेगळ्या प्रदेशातून (लँडस्केप) टप्प्याटप्याने वाघ आणले जाणार आहेत. त्यासाठी मोठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यांना पकडण्यापासून त्यांचा प्रवास, वैद्यकीय तपासण्या आणि बदललेला भूप्रदेश यामुळे त्यांच्यावर निर्माण झालेला ताण हलका करून मग त्यांना वन्य अधिवासात सोडले जाईल. यामुळे त्यांची या परिसरामध्ये टिकून राहण्याची शक्यता अधिक वाढणार आहे. यासाठी व्यवस्थित तयारी केली जात आहे.

नियोजनबद्ध प्रयत्न

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढावी यासाठी वनखात्याने २०१७ पासून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पात वाघांचा अधिवास असण्यासाठी संरक्षण, तृणभक्षी प्राणी आणि अबाधित जंगल या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये २७ हून अधिक वाघ वास्तव्यास राहू शकतात, अशी माहिती तुषार चव्हाण यांनी दिली. त्यापैकी ४५० चौरस किलोमीटर क्षेत्रात आता वाघांचं स्थानांतरण करता येणार आहे. चांदोलीजवळच्या सागरेश्वर अभयारण्यातून २०२१ पासून चितळ स्थानांतरित करण्याचा ’प्रे-ऑगमेंटेशन’ प्रकल्प चालू आहे. याशिवाय इतर ठिकाणांवरूनही तृणभक्षी प्राणी आणण्याच्या परवानग्या मिळाल्या आहेत.अशी असेल वाघ स्थलांतरणाची प्रक्रियाविदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त ५० वाघ असल्याची माहिती आहे. त्यामुळे सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करताना टप्प्याटप्प्याने म्हणजे प्रथम एक किंवा दोन वाघ सह्याद्रीत स्थलांतर केल्यानंतर त्यांचे मॉनिटरिंग करण्यात येईल. हे वाघ सह्याद्रीत रमले की नाही, या निरीक्षणाअंती पुढील निर्णय घेऊन इतर वाघ आणले जातील. या साऱ्या प्रक्रियेला किमान दोन महिने लागू शकतील.