शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोश्यारींचा राजीनामा मंजूर केल्यामुळे कोल्हापुरात मविआकडून फटाके वाजवून आनंदोत्सव

By संदीप आडनाईक | Updated: February 12, 2023 13:53 IST

Kolhapur News: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यामुळे कोल्हापूरात नाथा गोळे तालमीजवळील सुप्रभा मंच कार्यालयात महाविकास आघाडीने रविवारी बोलावलेल्या बैठकीत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

- संदीप आडनाईककोल्हापूर - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यामुळे कोल्हापूरात नाथा गोळे तालमीजवळील सुप्रभा मंच कार्यालयात महाविकास आघाडीने रविवारी बोलावलेल्या बैठकीत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी, दीक्षांत समारंभादिवशी शिवाजी विद्यापीठात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल कोश्यारी यांना विद्यापीठाने दीक्षांत समारंभासाठी निमंत्रित केले होते. त्याचा आघाडीच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी नाथा गोळे तालमीजवळ बोलावलेल्या व्यापक बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवभक्त लोकआंदोलन समितीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रास्तविक केले. भगतसिंग कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा घेतला गेल्याने या आंदोलनाला यश मिळाल्याचे चव्हाण म्हणाले. शिवाजीराव परुळेकर म्हणाले, शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर असलेल्या व्यक्तीने राज्यपालांना बोलावणे हे चुकीचे आहे. आता कुलगुरुंनाही हाकलले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि सर्वपक्षीय समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, कोल्हापूरकरांनी एकत्र येउन कोश्यारी यांना त्यांची योग्य जागा दाखवली. ठरल्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठात सकाळी ११ वाजता सर्व कार्यकर्ते एकत्र येउन शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि कुलगुरुंना जाब विचारतील.

शिवभक्त लोकआंदोलन समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक म्हणाले, सुंठेवाचून खाेकला गेला आणि, औषधाविना खरुज गेली आहे. आता विद्यापीठात आनंदोत्सव साजरा करु. या बैठकीला गुलाबराव घोरपडे, विक्रम जरग, अशोकराव भंडारे, संपतराव चव्हाण, उदय पोवार, दुर्वास कदम, कादर मलबारी, रफिक शेख, अमर देसाई, निरंजन कदम, विजय केसरकर, वाहिदा मुजावर, लीला धुमाळ, वैशाली महाडिक, हेमलता माने आदी उपस्थित होते.

फटाके वाजवून आनंदोत्सवयावेळी नाथा गोळे तालमीसमोर फटाके वाजवून राज्यपाल काेश्यारी यांच्या राजीनाम्याचा आनंदोत्सव साजरा केला. शिवाजी महाराज की जय, कोश्यारी मुर्दाबाद, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात येत होता. यादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर