शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मी कळायला अनेक जन्म लागतील, चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 12:18 IST

मी कशातच अडकत नाही म्हणून विरोधक हैराण

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून मी राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांसाठी मी कोठून पैसे आणतो, याची चौकशी विरोधक करत आहेत. त्यातूनच माझ्यावर शाई फेकण्याचा प्रकार झाला, तरीही मी कशात अडकत नाही म्हटल्यावर ते हैराण झाले आहेत. त्यातूनच ते माझ्यावर टीका करत आहेत, ठीक आहे, त्यातून त्यांना पुण्य मिळत असेल तर आणखी टीका करा, असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.मंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून दौलतनगर, कोल्हापूर येथे आयोजित मोफत फिरता दवाखान्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव, राहुल चिकोडे, नवोदिता घाटगे आदी उपस्थित होते.मी कळायला तुम्हाला आणखी जन्म घ्यावा लागेलपहाटे पाच वाजता माझे काम सुरू होते, कधी आजारी पडत नाही, नेहमी हसतखेळत असतो, याबद्दल विरोधकांना आश्चर्य वाटते. मात्र, मी कळायला तुम्हाला आणखी जन्म घ्यावा लागेल, असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला.शेट्टी महायुतीसोबत येतील‘स्वाभिमानी’ व ‘रासप’ हे महायुतीसोबत येणार असल्याबाबत विचारले असता, मंत्री पाटील म्हणाले, ‘रासप’ आमच्यासोबत आहेच, ‘स्वाभिमानी’ही होती. मध्यंतरीच्या काळात ते बाजूला गेले. तरीही राजू शेट्टी यांच्याशी आमचा संवाद असतोच, शेट्टी महायुतीसोबत येतील, याचा विश्वास आहे.धनंजय महाडिक यांच्या मंत्रिपदाबाबत संकेतमाझ्या पदरात जे पुण्य गोळा होईल, त्यातील महेश जाधव, अशोक देसाई आदींना थोडे थोडे देत असतो. धनंजय महाडिक यांना राज्यसभा सदस्य केले, त्यांच्यासाठीही काही पुण्य अजून शिल्लक ठेवले असून, ते लवकरच दिसेल, अशा शब्दांत महाडिक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळेल, असे संकेत मंत्री पाटील यांनी दिले.राऊत हिंमत असेल तर राजीनामा द्या‘दादा हवा जोरात आहे टोपी सांभाळा’ अशी टीका संजय राऊत माझ्यावर करतात. मात्र, राऊत तुमच्या टोपीची काळजी करा, हिंमत असेल तर राजीनामा द्या, ज्या आमदारांच्या जिवावर खासदार झाला, त्यांना रोज शिव्याशाप देण्यापेक्षा राजीनामा देऊन पुन्हा राज्यसभेत जाऊनच दाखवा, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.चिंचवडची जबाबदारी तुम्ही घेणार का?कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसल्याने सगळेच विरोधक निराश झाले आहेत. त्यातून रोज त्रागा करत आहेत. कसब्यात यापूर्वीही झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. २००९ पासूनच्या तिन्ही निवडणुकीत विरोधातील उमेदवारांच्या मताची बेरीज भाजपपेक्षा अधिक होतीच, यावेळेला पराभवाच्या भीतीने घट्ट मिठी मारल्यानेच मत विभाजन टळले आणि विजयी झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. कसब्याची आम्ही जबाबदारी स्वीकारली तशी ‘चिंचवड’ची जबाबदारी विरोधक घेणार का, असा सवाल मंत्री पाटील यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील