शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सरस सादरीकरणासाठी कलाकारांचा रात्रीचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:35 IST

राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या ५९व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेसाठी १३ ठिकाणी रंगीत तालीम सुरू आहे. यांतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि पडद्यामागील मान्यवरांची धावपळ सुरू आहे. यात काही संस्थांच्या तालमी १२ तासांहून अधिक काळ सुरू आहेत.

ठळक मुद्देसरस सादरीकरणासाठी कलाकारांचा रात्रीचा दिवसतब्बल २९ नाटकांची रसिकांना मेजवानी

कोल्हापूर : राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या ५९व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेसाठी १३ ठिकाणी रंगीत तालीम सुरू आहे. यांतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि पडद्यामागील मान्यवरांची धावपळ सुरू आहे. यात काही संस्थांच्या तालमी १२ तासांहून अधिक काळ सुरू आहेत.महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या वर्षी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेत २९ संघांनी सहभाग नोंदविला असून, यातील पाच संघ नवीन आहेत. विशेष म्हणजे तब्बल २७ संघ हे जिल्ह्यातील आहेत; तर दोन संघ बेळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे यंदाही प्रतिवर्षाप्रमाणे रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळणार आहे.येथील केशवराव भोसले नाट्यगृहात रोज सायंकाळी सात वाजता २६ नाट्यसंस्थांची नाटके सादर होणार आहेत. तीन नाट्यप्रयोग दुपारी बाराच्या सुमारास सादर होणार आहेत. या स्पर्धेत दहाहून अधिक संहिता नव्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील नाट्यसंस्थांनी या स्पर्धेत सुरुवातीपासूनच सहभाग नोंदविलेला आहे.कोल्हापूर केंद्रावर कोकणसह सांगली, सातारा येथीलही संघ सहभागी होत होते. सध्या शहरासह शाहूवाडी, चंदगड, भुयेवाडी (ता. करवीर), चोकाक (ता. हातकणंगले), सेनापती कापशी (ता. कागल), इचलकरंजी, जयसिंगपूर, कसबा बावडा, निगवे (ता. करवीर) व बेळगाव येथील संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

दिग्दर्शक, नाट्यनिर्माते, कलाकारांचा स्पर्धेच्या तयारीसाठी रात्रीचा दिवस सुरू आहे. शहरातील देवल क्लब, शिवाजी विद्यापीठाचा नाट्य विभाग, शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर, स्टर्लिंग टॉवर, देवल क्लबसमोरील खासगी इमारत, आदी ठिकाणी कलाकार कसून सराव करीत आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी विशेषत: रात्रीच्या वेळी तालमी रंगत आहेत.

संख्या वाढल्यामुळे यंदाच्या प्राथमिक फेरीत दर्जेदार नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. त्यामुळे नाट्यरसिकांना खास मेजवानीच मिळणार आहे.- किरणसिंह चव्हाण, दिग्दर्शक, अंदाधुंदपरिवर्तन फौंडेशन संस्था

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूरNatakनाटक