शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांनी रोखला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 21:13 IST

राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास शासनाने  परवानगी देऊन कलाकारांची उपासमार थांबवावी अन्यथा ४ ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार असा इशारा कलाकार महासंघाच्यावतीने देत कलाकारांनी दुपारी बारा वाजता शिरोली दर्गा येथे  पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखला.

ठळक मुद्देकलाकारांनी रोखला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग४ ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार

शिरोली- राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास शासनाने  परवानगी देऊन कलाकारांची उपासमार थांबवावी अन्यथा ४ ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार असा इशारा कलाकार महासंघाच्यावतीने देत कलाकारांनी दुपारी बारा वाजता शिरोली दर्गा येथे  पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखला.पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवर शिरोली पुलाची दर्ग्याजवळ कलाकारांच्या विविध  मागण्यासाठी कलाकार महासंघाच्यावतीने रास्तारोको करण्यात आला  यावेळी शिरोली पोलिसांनी त्याना ताब्यात घेवून सुटका केली.

यावेळी कोल्हापूर , सांगली , सातारा जिल्ह्यातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते . संघटनेचे अध्यक्ष अनिल मोरे म्हणाले की देशासह राज्यावर कोरोना सारख्या महामारीचे संकट आले असताना त्यातुन सावरण्यासाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे. पण या संकटामुळे कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कलाकाराना आर्थिक मदत शासने द्यावी यासाठी आजपर्यंत प्रधानमंत्री , मुख्यमंत्री , मंत्री , खासदार यांना वेळोवेळी  निवेदन देवून ही शासन कलाकारांच्या पाठीशी उभाराहत नसेल तर विधान भवनासमोर ४ ऑक्टोबर रोजी आक्रोश आंदोलन छेडण्याचा  इशारा मोरे दिला आहे.कलाकार आपली कला सादर करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो गेल्या वर्षभरात कलाकारांच्यावर अनेक संकटे आली आणि आता जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातल्याने देशासह राज्यात लॉकडाउन जाहीर झाले आणि यात्रा जत्रा लग्नसंमारंभ व आता गणेश उत्सव वाया गेला. सर्व क्षेत्रातील कलाकारांचे कार्यक्रम बंद झाले कलाकार घरातच बसून प्रशाषणाला मदत करीत राहिला. कलाकारांची कला सादर झाली तरच त्यांच्या कुटुंबाच पोट भरतं.

गेले ६ महिने कलाकार व मालक घरीच बसून राहिल्याने कलाकार व मालक लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता अनलॉक सुरू झाले असुन जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. मग आमचा व्यवसाय का बंद आमचा व्यवसायला ही परवानगी द्यावी. अशी वारंवार मागणी करूनही सरकार कलाकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. याचा निषेध करत कलाकारांनी महामार्ग रोखला. पोलिसांनी विरोध केल्यानंतर काही आंदोलकांनी रस्त्यावर झोपले होते. आमच्या अंगावर वाहने घाला, पण आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलक कार्यकर्त्यांना हटवले.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जयवंत वायदंडे, अनिता पाटील, राम कुंभार, विश्वास ढाले, उमर मुल्ला, शोभा पाटील, विकास साठे, महेश कदम, सात्तापा पाटील, सुनिल पाटील, उमेश अवघडे, विजय गावडे, गिरीश कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी होते.रामचंद्र जाधव, गिरीधर इंगोले, उदयराज पोवार, महेश कदम, संदिप साठे,अनिल वागवेकर, उमेश अवघडे, सुनिल पाटील,आश्रापा कांबळे, विजय गावडे,सातापा पाटील,विकास साठे, गिरीश कांबळे, नागराज पाच्छे,एम एस कांबळे, कलापथक निर्माते मुकूंद सुतार,ऊमर मुल्ला,रजनी गोरड,शोभा पाटील,हिलगे वहिणी,अमित पाटील किशोर भारती,कुमार घोरपडे,तुषार गोसावी,वर्षा धुमाळ,उदय कांबळे सातार्याचे सुनिल कांबळे,प्रशांत साठे शिवाजी पोवार, रामचंद्र भिमराव जाधव, सुरेश वारे , सुनिल नागरपोळे , सचिन आवळे ,सागर साठे , सुनिल कोरवी सागर गेजगे ,अक्षय देसाई ,प्रकाश जाधव , युवराज जाधव, इत्यादी कलाकार उपस्थित होते.शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, रमेश ठाणेकर,अतुल लोखंडे यांच्यासह पोलीस कर्मचारी तैनात होते. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर