शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील महागणपतीचे मोठ्या उत्साहात आगमन, पहिल्याच दिवशी दर्शनासाठी खुला होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:34 IST

आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या अंथरून महागणपतीचे स्वागत

कोल्हापुर : आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या, ढोल-ताशांचा निनाद, मोरयाचा अखंड गजर अशा भक्तीमय वातावरणात येथील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी महागणपतीचे मंगळवारी उत्साहात आगमन झाले. हा गणपती पाहण्यासाठी बिंदू चौकात महिलांसह बालचमुंनी मोठी गर्दी केली होती.येत्या मंगळवारी गणेशाची प्रतिष्ठापना होणार असून शिवाजी चौक तरुण मंडळाच्या महागणपतीचे मंगळवारी आगमन झाले. मार्केट यार्डातून दुपारी दोन वाजता महागणपतीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. सायंकाळी साडेपाच वाजता बिंदू चौकात ही मिरवणूक पोहचली. आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या अंथरून महागणपतीचे स्वागत करण्यात आले.

मोरयाचा अखंड गजर व आम्ही कोल्हापुरकर ढोल-ताशा पथकाच्या वाद्याने बिंदू चौक परिसर निनादुन गेला. बिंदू चौकातून महागणपतीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कृष्णराज महाडिक, मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू, सुहास भेंडे, प्रसाद वळंजू, अक्षय शिंदे, गणेश वळंजू, दिलीप खोत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.पहिल्याच दिवशी दर्शनासाठी खुला होणारप्रत्येक वर्षी महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्ती गर्दी करत असतात. यंदा १९ सप्टेंबरला प्रतिष्ठापणा झाल्यानंतर पहिल्याच दिवशी महागणपती दर्शनासाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर