शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वस्त्रनगरीत गणरायाचे आगमन साधेपणानेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही वस्त्रनगरीत गणरायाचे आगमन साधेपणाने करण्यात आले. रुग्णसंख्या घटल्याने कार्यकर्त्याच्यात गतवर्षीपेक्षा यंदा उत्साह अधिक होता. ...

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही वस्त्रनगरीत गणरायाचे आगमन साधेपणाने करण्यात आले. रुग्णसंख्या घटल्याने कार्यकर्त्याच्यात गतवर्षीपेक्षा यंदा उत्साह अधिक होता. सकाळपासून घरगुती गणपतीच्या आगमनाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांच्या ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना सुरू होती. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरातील विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहापूर खणीला भेट देऊन शहरातील मुख्य मार्गाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

सन २०१९ पासून महापूर, कोरोना, पुन्हा महापूर अशा विविध नैसर्गिक आपत्तीत सापडल्याने वस्त्रोद्योग नगरीत गणेशोत्सवावर परिणाम जाणवत आहे. मोठमोठ्या आकर्षक गणेशमूर्ती परराज्यातून आणून स्थापन करण्याबरोबरच अतिशय उत्साहपूर्ण व नावीन्यपूर्ण गणेशोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. परंतु नैसर्गिक संकटांमुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठा गाजावाजा न करता प्रतिष्ठापना करण्यात आली. पारंपरिक वाद्ये आणि गणरायाचा जयघोष करत सार्वजनिक मंडळांनी ही प्रतिष्ठापना केली.

शहरात काही सामाजिक संस्थांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध केल्या आहेत. त्या बसविण्याकडेही नागरिकांचा कल वाढत आहे. शहरातील कलानगर, सोन्या-मारुती मंदिर, कुंभारवाडा, दत्तमंदिरजवळ, शाळा नं. २, आदी प्रमुख ठिकाणी मोठ्या मंडळांच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी झाली होती. मुख्य मार्गावर घरगुती गणेशमूर्ती, आरास व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी स्टॉलवर भाविकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या कार्यालयात शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेबाबत सूचना दिल्या. वाहतुकीच्या मार्गाबाबत ही आढावा घेतला. शहरात छत्रपती शाहू पुतळा ते गांधी पुतळा मार्गावर मोठ्या वाहनास बंदी घातली होती. तसेच शहरातील प्रमुख चौकांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

फोटो ओळी

१००९२०२१-आयसीएच-०३

इचलकरंजीत हत्ती चौक परिसरातील एका कुटुंबीयाच्या बालचमूंसह सर्वच सदस्यांनी फेटे बांधून घरगुती गणेशमूर्ती जयघोष करत नेली.

१००९२०२१-आयसीएच-०४

आपल्या लाडक्या बाप्पाला एका कुटुंबाने मोटारसायकलवरून घरी आणले.

१००९२०२१-आयसीएच-०५

बालचिमुकल्यांनी गणरायाचा जयघोष करत आनंद व्यक्त केला.

१००९२०२१-आयसीएच-०६

धनगरी वेश परिधान करून एका परिवाराने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.

१००९२०२१-आयसीएच-०७

पारंपरिक वाद्यांच्या गजरात लहान मंडळाने ‘श्रीं’ ची मिरवणूक काढली.

सर्व छाया-उत्तम पाटील