शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

बाप्पाच्या स्वागताला बरसल्या जलधारा-- जल्लोषी आगमन :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:50 IST

कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया,’ ‘गणेश गणेश मोरया’चा गजर, ढोल- ताशा पथकांचा निनाद, दुसरीकडे बँड, बेंजो आणि सनईचे सूर, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगारलेल्या महिला, मुली; पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्नांचा दरवळ, खीर-मोदकांचा प्रसाद अशा थाटात शुक्रवारी प्रथमपूज्य, ऐश्वर्यदाता, बुद्धीचा अधिष्ठाता आणि सुखसमृद्धीची बरसात करणाºया श्री गणरायाचे आगमन झाले.

ठळक मुद्देपारंपरिक वाद्यांचा गजर; पावसामुळे सणाचा आनंद द्विगुणित; कुंभारवाडे फुललेही जुन्या विचारसरणी मागे सारत गेल्या काही वर्षांपासून मुलींच्या हस्ते गणपतीच्या मूर्ती नेण्याचे प्रमाण वाढले आहेपुरुषांची मक्तेदारी व रूढी-परंपरांना खºया अर्थाने छेद देण्याचे काम समाजाकडून होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसले.धनगरी ढोल अशा वाद्यांच्याच निनादात गणेशमूर्तींची मिरवणूक काढली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया,’ ‘गणेश गणेश मोरया’चा गजर, ढोल- ताशा पथकांचा निनाद, दुसरीकडे बँड, बेंजो आणि सनईचे सूर, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगारलेल्या महिला, मुली; पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्नांचा दरवळ, खीर-मोदकांचा प्रसाद अशा थाटात शुक्रवारी प्रथमपूज्य, ऐश्वर्यदाता, बुद्धीचा अधिष्ठाता आणि सुखसमृद्धीची बरसात करणाºया श्री गणरायाचे आगमन झाले. पावसाळ्यातही दडी मारलेल्या वरुणराजाला आपल्यासोबत आणत लाडक्या गणरायाने भक्तांना दिलासा देत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

गेल्या महिन्याभरापासून भाविक ज्या गणेशोत्सवाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते, जय्यत तयारी करीत होते, तो गणेशचतुर्थीचा दिवस अखेर शुक्रवारी उगवला. गणपतीच्या भक्तिगीतांनी शुक्रवारची सकाळ सुरू झाली. दारात इंद्रधनुषी रंगांनी सजलेल्या रांगोळीचा गालिचा, घरादाराची साफसफाई झाल्यानंतर महिला श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी गव्हाची खीर, मोदकासह पंचपक्वान्नांचा नैवेद्य करण्यात गुंतल्या.

बालचमू पारंपरिक वेशात सजून घरातील पुरुषांना व मोठ्यांना गणपतीच्या सजावटीसाठी मदत करीत होते. वृद्ध माणसे प्रत्येक कामात सहकार्य करीत होती. एकीकडे घराघरांत ही लगबग सुरू असताना दुसरीकडे आपला देव घरी आणण्यासाठी आलेल्या भाविकांनी कोल्हापुरातील कुंभारवाडे गर्दीने फुलून गेले होते. फक्त शहरातीलच नव्हे तर कंदलगाव, पाचगाव, सरनोबतवाडी, नागदेववाडी अशा आसपासच्या गावांतूनही अनेक नागरिक कुंभारवाड्यांतून गणेश मूर्ती नेत होते.

लहान मुले, मुली, वयस्कर माणसे, महिला अशा कुटुंबासह आलेले भाविक फटाक्यांची आतषबाजी, बॅँड-बाजा, ढोल-ताशा पथक, सनईच्या सुरावटीच्या साथीने आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत श्री गणेशाची मूर्ती नेत होते. यानिमित्त पापाची तिकटी, कुंभार गल्ली येथे जाणारे महाद्वार रोड, गंगावेश, महापालिका आणि शिवाजी चौक हे रस्ते अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आले होते. पायी चालत श्री गणेशाला घरी नेतानाच अनेकांनी फुलांच्या माळांनी सजविलेली हातगाडी, रिक्षा, चारचाकी अशा वाहनांतून बाप्पांची स्वारी घरी आणली.

फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर दारात उभारलेल्या सुवासिनींनी श्री गणरायाची दृष्ट काढत त्याचे औक्षण केले.रात्र-रात्र जागून खास बाप्पांसाठी तयार केलेल्या आराशीमध्ये बाप्पांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. पाच फळांची मांडणी, सुवासिक धूप-दीपाचा दरवळ, आरतीचे ताट, समईचा मंद प्रकाश, अभिषेक, प्रसाद, समोर पक्वान्नांचा नैवेद्य अशा थाटामाटात श्री गणेशाची पहिली आरती करण्यात आली.त्यानंतर कुटुंबीयांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारनंतर गणेश मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली.मुली, महिलांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापनामुला-मुलींमधील भेदभाव न करणाºया राजर्षी शाहू महाराजांची भूमी म्हणून सर्वत्र ख्यातकीर्त असलेल्या कोल्हापुरात पुन्हा त्याचीच प्रचिती शुक्रवारी आली.महिलांनी देवाच्या मूर्तीला हात लावायचा नाही, ही जुन्या विचारसरणी मागे सारत गेल्या काही वर्षांपासून मुलींच्या हस्ते गणपतीच्या मूर्ती नेण्याचे प्रमाण वाढले आहे.पापाची तिकटी, शाहूपुरी, बापट कॅम्प या सगळ्या कुंभार गल्लीमध्ये सजून आलेल्या महिला मुली श्री गणेशाची मूर्ती नेत होत्या. त्यांच्याच हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठापनाही केली जात होती.पुरुषांची मक्तेदारी व रूढी-परंपरांना खºया अर्थाने छेद देण्याचे काम समाजाकडून होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसले.पारंपरिक वाद्यांचाच आवाजदरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासनाने ‘नो-डॉल्बी’ची हाक दिली आहे. श्री गणेशाच्या आगमनादिवशी पारंपरिक वाद्यांचाच आवाज घुमला. घरगुती गणेशासोबतच अनेक मंडळांनी बँड-बेंजो पथक, ढोल-ताशा, धनगरी ढोल अशा वाद्यांच्याच निनादात गणेशमूर्तींची मिरवणूक काढली.