शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus In kolhapur : अलगीकरणाची व्यवस्था गावपातळीवरच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 10:09 IST

CoronaVirus In kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे.त्यामुळे त्यांच्या संस्थात्मक अलगीकरणाची व्यवस्था गावपातळीवरच करावी,असे आवाहन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले.

ठळक मुद्देअलगीकरणाची व्यवस्था गावपातळीवरच करा गडहिंग्लज पंचायत समितीच्या मासिक सभेत गटविकास अधिकारी शरद मगर यांचे आवाहन

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे.त्यामुळे त्यांच्या संस्थात्मक अलगीकरणाची व्यवस्था गावपातळीवरच करावी,असे आवाहन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले.पंचायत समितीच्या मासिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती रुपाली कांबळे होत्या. कोरोनामुळे ही सभा अॉनलाईन पध्दतीने झाली. जिल्हयातील अन्य तालुक्यात रूग्ण संख्या कमी होत असताना गडहिंग्लज तालुक्यातील रूग्ण का वाढत आहे?असा मुद्दा विठ्ठल पाटील यांनी उपस्थित केला.त्यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी सविस्तर खुलासा केला.मगर म्हणाले, अ‍ॅण्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या तालुक्यात वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असणारेदेखील बाधितांच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळेच आपल्या तालुक्यातील रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे.

विजयराव पाटील म्हणाले,ठिबक सिंचनासाठी अर्ज भरण्यापासून सर्व प्रक्रीया ऑनलाइन आहे. लाभार्थींची निवड सुध्दा ऑनलाइन सोडतीमधूनच होते. परंतु, ग्रामीण शेतकर्‍यांना ही प्रक्रिया समजत नाही. त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहतात. त्यासाठी प्रक्रियेत लवचिकता आणावी.श्रीया कोणकेरी म्हणाल्या, जरळी बंधारा व भडगाव पुलाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.जयश्री तेली म्हणाल्या, कृषीसेवक माहिती देत नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कृषीसेवकांनी शासनाच्या कृषी योजना व उपक्रमांची माहिती प्रत्येक शेतकर्‍यापर्यंत पोहचेल याची दक्षता घ्यावी.बनश्री चौगुले म्हणाल्या, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू व अन्य साथींच्या आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.सभेला उपसभापती इराप्पा हसुरी, इंदूमती नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.‌११ वीची प्रवेशपरीक्षा ऐच्छिक११ वी प्रवेशासाठी यावर्षी ‍ शासनाने ऐच्छिक प्रवेश परीक्षेचे नियोजन केले आहे.त्याकरिता १०० गुणांचे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार नाहीत, त्यांना दहावीचे गुण आणि अंतर्गत मूल्यमापन गुणांच्या आधारे प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी दिली.१४,४४५ नागरिकांची तपासणीगडहिंग्लज तालुक्यात १० जूनअखेर १४ हजार ४४५ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ७६५२ जणांची आरटीपीसीआर तर ६७९३ जणांची अ‍ॅण्टीजेन तपासणी केली आहे.त्यामुळेच बाधितांची संख्या अधिक दिसत असून सध्या ५९८ रुग्ण उपचार घेत आहेत,असेही गटविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpanchayat samitiपंचायत समितीkolhapurकोल्हापूर