शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

सेना, भाजप, मोकाशी, भोसले गट एकत्र येणार?

By admin | Updated: July 13, 2016 00:47 IST

पन्हाळा पालिकेसाठी हालचाली गतिमान : पाटील गटाचे जनसुराज्य पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष

नितीन भगवान -- पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेसाठी नगरसेवकपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिवसेना-भाजप-मोकाशी-भोसले गट एकत्रित आघाडी स्थापन करून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत; तर पाटील गट जनसुराज्य पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहे. पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेसाठी १७ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. यापैकी नऊ महिला आहेत. सरासरी प्रत्येक प्रभागात १४४ मतदान असेल. दोन प्रभागांतील मतदान ३०० च्या आसपास असणार आहे. प्रत्येक मताला महत्त्व आहे. यावेळी थेट दोन पॅनेलमध्ये लढत होणार असून, भाजप-शिवसेनेनेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. मोकाशी-भोसले यांच्या गटाशी सलगी करत त्यांनी पन्हाळा विकास आघाडी स्थापन केली आहे. यात पाटील गट सहभागी होण्यास इच्छुक आहे; पण जनसुराज्य शक्ती पक्ष कोणती भूमिका घेणार, यावर त्यांचा आघाडीत जाण्याचा निर्णय ठरणार आहे. दुसरे पॅनेल जनसुराज्य शक्ती पक्षाचे असेल. या पक्षाची धुरा सलग दहा वर्षे पाटील गटाकडे होती. याचे प्रमुख विजय पाटील यांना बाजूला केले, तरच जनसुराज्यकडून आम्ही लढू, असा सूर विद्यमान नगरसेवकांमध्ये आहे. यातील काही नगरसेवक पन्हाळा विकास आघाडीमधून उभे राहण्यात इच्छुक आहेत. त्यामुळे मोकाशी व भोसले गटाचा सध्या वरचष्मा आहे. सर्वांत कमी मतदार असलेली नगरपालिका म्हणून पन्हाळा नगरपरिषद ओळखली जात आहे. या ठिकाणचे राजकारण नेहमीच गट पातळी आणि सलोख्याचे होते. पक्षपातळीवर येथील राजकारण कधीच झाले नाही. यावेळी मात्र पैशाचे राजकारण होणार आहे. विधान परिषदेवेळी नगरसेवकांची झालेली सहल, खरेदी, विमान प्रवास आणि मिळालेली भरघोस मदत, हे याचे कारण आहे.पन्हाळा विकास आघाडीची जास्तीतजास्त भिस्त मोकाशी-भोसले गटावरच आहे. या गटाची सर्व जबाबदारी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगराध्यक्षांचे ज्येष्ठ बंधू बाळासाहेब मोकाशी हे करीत आहेत. त्यांच्याकडून सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू असून, ते काही मतदार व उमेदवारांना घेऊन अजमेर दर्ग्याच्या भेटीला निघाल्याचे समजते. भोसले गटाचे कमलाकर भोसले हे ही माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांचे पुत्र सतीश भोसले हे माजी नगरसेवक आहेत. हे दोघे भोसले गटाची धुरा वाहत आहेत. यावेळी सतीश भोसले नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.विरोधी जनसुराज्य शक्ती पक्षाची बाजू सध्या भक्कम नाही. त्यांना उमेदवार मिळविण्यासाठी कसरत करावी लागेल, अशी परिस्थिती आहे. पाटील गटाच्या इच्छुकांचा पन्हाळा विकास आघाडीकडे कल आहे. यावेळी नगरपरिषद निवडणुकीसाठी संपूर्ण गाव विकास आघाडीच्या बाजूला असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत.