शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: यड्रावच्या ग्रामसभेत अध्यक्षपदावरून वादावादी, अखेर ग्रामसभा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 14:28 IST

यड्राव : ग्रामसभा अध्यक्ष निवडीवरून झालेली वादावादी, ग्रामसेवकाने सांगितलेला नियम, सभा त्याग केलेले सत्ताधारी गट तर कोरम असूनही सभा ...

यड्राव : ग्रामसभा अध्यक्ष निवडीवरून झालेली वादावादी, ग्रामसेवकाने सांगितलेला नियम, सभा त्याग केलेले सत्ताधारी गट तर कोरम असूनही सभा पुढे  घेण्यासाठी ग्रामसेवकांपुढे आग्रही असलेले ग्रामस्थ. तर माजी सरपंच व उपसरपंच यांनी समन्वयाची भूमिका घेतल्याने अखेर ग्रामसभा रद्द करण्यात आली. यामुळे परस्पर विरोधी घोषणा दिल्याने वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते.ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामसभा व्हिडिओ रेकॉर्डिंग करूनच घेण्यासाठी  प्रशासनास धारेवर धरले. ग्रामसेवक उमेश रेळेकर यांनी  सभेचे अध्यक्षपद सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वीकारावे अशी सुचविले. त्याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवून ग्रामस्थातून सभा अध्यक्ष निवडावा अशी मागणी जोर लावून धरल्याने गोंधळ सुरु झाला. ग्रामसेवकांनी सभेचा अध्यक्ष पदसिद्ध सरपंचच असतो त्यामुळे तो निवडता येणार नाही असे सांगितल्यावर ग्रामस्थ संतप्त झाले. विरोधी गट ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून सरपंचांसह सत्ताधारी गट यानी सभेतून निघून जाताना सभा रद्द केल्याची घोषणा सरपंच यांनी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी याची साम्राज्य केली आहे असे सांगितले. तर ग्रामस्थांनी या सभेसाठी कोरम पूर्ण असल्याने ही सभा झालीच पाहिजे यासाठी ग्रामसेवक उमेश शिराळकर यांना घेराव घातला. सभा रद्द झाल्याचे लेखी पत्र ग्रामसेवकाकडून मिळाल्यानंतर माजी सरपंच सरदार सुतार व माजी उपसरपंच विजय पाटील यांनी व ग्रामस्थांनी सभागृह सोडले

काही लोकांनी गोंधळ घातला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही सभा त्याग केला. गटविकास अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन  पुढील ग्रामसभा घेवू - कुणालसिंह नाईक निंबाळकर, सरपंच 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत