शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: यड्रावच्या ग्रामसभेत पुन्हा वाद, ऐनवेळचे विषय चर्चेत घेतले नसल्याने ग्रामस्थ संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 11:28 IST

ग्रामसेवकांवर ग्रामस्थांचा रोष

यड्राव : येथील ग्रामसभेमध्ये मागील सभेचे प्रोसिडिंग कायम करण्याच्या विषयावरून चर्चा रंगली असतानाच ऐनवेळी येणारे विषय चर्चेला घेतले जाणार नाहीत, असे सरपंचांनी सभेपुढे सांगितल्यावर ग्रामस्थांनी गोंधळाला सुरुवात केली. ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा न करता केवळ पंधरा मिनिटात सभा संपवून सत्ताधाऱ्यांनी सभागृह सोडले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवक उमेश रेळेकर यांना धारेवर धरले.१५ डिसेंबर रोजी सरपंच यांनी रद्द केलेली ग्रामसभा मंगळवारी घेण्यात आली. गटविकास अधिकारी यांच्याकडून झालेल्या मार्गदर्शनानुसार सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर यांना सभा अध्यक्ष करण्यात आले. त्यास सर्वानुमते मंजुरी मिळाली. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे या विषयावरून मागील ग्रामसभा कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत निर्णय होईपर्यंत त्या सभेतील झालेले ठराव जैसे थे ठेवण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. त्यावर ग्रामसेवकांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे हा विषय प्रलंबित ठेवला.विषयपत्रिकेवरील इतर विषयांना ग्रामस्थांनी मंजुरी देत ऐनवेळचे विषय चर्चेसाठी घेण्याची मागणी केली. परंतु, सभाध्यक्ष सरपंच यांनी या सभेत ऐनवेळी आलेले विषय चर्चेला घेतले जाणार नाहीत, असे सांगितले आणि सभा संपल्याचे जाहीर केले. परंतु, ग्रामस्थांनी ऐनवेळेच्या विषयासाठी दिलेल्या लेखी अर्जावर चर्चा झालीच पाहिजे यासाठी आग्रह धरला. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेवक उमेश रेळेकर यांना चांगले धारेवर धरले.परंतु, सभाध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केल्याने आता काही करता येत नाही, असे स्पष्टीकरण दिले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले अन् त्यांनी ग्रामसेवकांना धारेवर धरून प्रश्नांचा भडिमार केला व मनमानी कारभार चालणार नाही असा संताप व्यक्त केला.ग्रामसेवकांवर ग्रामस्थांचा रोषग्रामसेवक उमेश रेळेकर यांना तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम न करता सत्ताधाऱ्यांचे नोकर म्हणून काम करीत आहात. तुम्ही आल्यापासून गावात अशांतता निर्माण झाली आहे. जनतेचा संयम सुटण्याआधी आपण गाव सोडून जावे, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्याने ग्रामसेवकांना ग्रामस्थांचा रोष पत्करावा लागला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत