शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

आर्दाळ रणरागिणींनी फुंकले दारूबंदीचे रणशिंग

By admin | Updated: November 23, 2014 23:47 IST

महिला गावसभेचे आयोजन : दारू दुकानाचा परवाना रद्द करा, चर्चेला उधाण

रवींद्र येसादे - उत्तूर -उत्तूरसारख्या मोठ्या गावाने दारूबंदी केल्यानंतर उत्तूर-आजरा मार्गावरील आर्दाळ (ता. आजरा) येथील हॉटेल परमीेट बार बंद करून या दारू दुकानाचा परवाना रद्द करावा, या मागणीसाठी आर्दाळच्या रणरागिनींनी रणशिंग फुंकले असून, १६ डिसेंबरला विशेष महिला गावसभेचे आयोजन केले. त्यामुळे उत्तूरपासून दीड कि. मी. अंतरावरील बीअरबार बंद होणार का? समोरील पेंढारवाडी (ता. आजरा) येथील हद्दीतील देशी दारू दुकान सुरू राहणार का ? या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.उत्तुरात दारूबंदी असल्याने उत्तूरसह परिसरात चोरटी दारू विनापरवाना विक्री सुरू असल्याचे समजते. आर्दाळ हद्दीतील या दुकानामुळे दारूच्या आहारी जावून ग्रामस्थांचे जीवन बिघडत आहे. वर्दळीच्या ठिकाणाचे दारू दुकान बंद करावे, अशा मागणीसाठी सरपंच अलका ससाणे यांचे अध्यक्षतेखाली मासिक सभा होवून महिलांची गावसभा घेण्याचे ठरले. गावातील तरूण मंडळे, महिला बचत गट, व्यसनमुक्ती केंद्राचा या दारूबंदीला पाठिंबा असल्याचे समजते. दरम्यान, बीअर बार बंद करावा यासाठी महिलांच्या सह्यांचे निवेदन राज्य दारू उत्पादन शुल्क कार्यालयास पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी काही ग्रामस्थ दारूबंदीची जनजागृती करीत आहेत. आर्दाळ (ता. आजरा) बीअरबारमध्ये मिळणाऱ्या विदेशी दारू मुळे आर्दाळ येथील युवक व्यसनाधीन बनले आहेत. अतिमद्यसेवनाने रस्त्यांवर पडत आहेत. आजरा-कोल्हापूर हा महामार्ग असल्याने वाहनांची गर्दी अधिक असते. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे दारूबंदीसाठी प्रबोधन करून प्रयत्न करणार.- अमोल बांबरे, ग्रा.पं.सदस्य आमचे हॉटेल आर्दाळ गावापासून दूर आहे. गावातील काही लोक दारू पिण्यासाठी येतात. मात्र, ग्रामस्थांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. हॉटेल सुरू झाल्यापासून सामाजिक कार्यासाठी आर्थिक सहकार्य करून गावाच्या कार्यात सहभागी असतो. त्यामुळे ग्रामस्थांनी गैरसमज करून घेवू नये.- कृष्णा सुतार, दारू विक्रेतागावच्या हद्दीतील दारू दुकान रद्द व्हावे, या मागणीसाठी महिलांशी चर्चा करून निर्णय घेणार असून, महिलांच्या लढ्यास आपला पाठिंबा आहे.- विजय वांगणेकर, उपसरपंच अनेक प्रश्न उपस्थित :-हॉटेल लायन पॅलेस गावापासून दूर १ कि. मी. अंतरावर आहे, त्याचा खरोखर त्रास होतो का ?८ ते १० वर्षांपूर्वी गावातील देशी दारू दुकानदाराने लायसन्स विकले. चोरटी दारू सुरू झाली. पुन्हा तसा प्रकार घडू नये.आर्दाळ (ता. आजरा) हद्दीतील दारू दुकान बंद झाले. पेंढारवाडीच्या हद्दीतील देशी दारू दुकान सुरू राहणार आहे. त्यांच्यावर निर्बंध कोणाचे? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.