शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तिलारी घाटात अवजड वाहतुकीला बसणार चाप; घाटाच्या पायथ्याशी, माथ्याशी उभारल्या कमानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 16:12 IST

कमानीची उंची वाढवावी

निंगाप्पा बोकडे  चंदगड : गोवा, दोडामार्ग, विजघर, तिलारी, घाट मार्गे बेळगाव व कोल्हापूर गोवा जवळचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक तिलारी घाटातून वाढली होती; पण अवजड वाहनांमुळे हा घाट धोकादायक बनल्याने अवजड वाहतुकीवर बंद व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून दहा फुटी कमान दोन ठिकाणी उभारली आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतुकीवर चाप लागणार आहे.तिलारी घाटातून अवजड वाहने जाण्यास मनाई असताना ती वाहने घालून अनेक ठिकाणी कठडे तोडले. त्यामुळे मोठे अपघात घडले. तर वाहने अडकून घाट बंद होण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या. यामुळे तिलारी घाटातून अवजड वाहने बंद करावी, अशी मागणी झाली असता सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. यानंतर त्यांनी जूनमध्ये अवजड वाहनांवर बंदी घातली आणि घाटाच्या माथ्यावर पायथ्याशी अवजड वाहने जाऊ नये, अशी कमान उभारावी, अशी सूचना दिली होती. यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटाच्या पायथ्याशी तसेच माथ्यावर कोदाळीजवळ मुख्य रस्त्यावर तीन मीटर कमान उभी केली आहे. यामुळे दहा फुटांपेक्षा उंच वाहने यांना आता चाप लागला आहे. एसटी बसला देखील फटका बसला आहे.

तिलारी घाटात गेल्या काही महिन्यांत अवजड वाहनांमुळे अनेक अपघात झाले. कित्येक तास घाट बंद होऊन वाहन धारक प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक वाहनांचे नुकसान झाले. बांधकाम विभागाने घाटात लाखो रुपये खर्च करून बांधलेले संरक्षण कठडे तोडले गेले. शिवाय तिलारी घाटात धोकादायक चढ-उतार, वळणामुळे अवजड वाहने सुटणे कठीण, शिवाय अवजड वाहनधारकांना अंदाज नसल्याने अनेक अपघात झाले होते. यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जून ते ३१ आक्टोबरपर्यंत तिलारी घाटातून बंदी घातली आणि एसटी बस सेवा बंद झाली आहे.

कमानीची उंची वाढवावीअवजड वाहनांना लगाम लावण्यासाठी दहा फुटी कमान उभारली; पण त्यापेक्षा उंच वाहन जाणार नाहीत, तसेच एसटी बस उंची बारा फूट असल्याने ती जाऊ शकणार नाही. यामुळे प्रवाशाचे हाल होणार आहेत. तेव्हा एसटी बस सुटली पाहिजे यासाठी बांधकाम विभागाने  कमानीची उंची बारा फूट करावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगड