शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मनमानी कारभार खपवून घेणार नाही, मंत्री मुश्रीफ यांचा सज्जड दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:31 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर लोकांची कामे करण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, सर्वांना विश्वासात घेऊन कामे करा, सत्ता आल्याच्या सहा महिन्यांतच तुम्ही मनमानी कारभार करणार असाल तर कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांना रविवारी भरला.

ठळक मुद्देमनमानी कारभार खपवून घेणार नाहीमंत्री मुश्रीफ यांचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

कोल्हापूर: जिल्हा परिषदेवर लोकांची कामे करण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, सर्वांना विश्वासात घेऊन कामे करा, सत्ता आल्याच्या सहा महिन्यांतच तुम्ही मनमानी कारभार करणार असाल तर कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांना रविवारी भरला.जिल्हा परिषदेमध्ये १५व्या वित्त आयोगासह अन्य निधी वाटप आणि पदाधिकारीसह कारभारी सदस्यांच्या कारभारावरून सत्ताधारी सदस्यांमध्येच सध्या जोरात धुसफूस सुरू आहे. या कारभारावरून नाराज झालेल्या सदस्यांनी मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे धाव घेत लक्ष घालण्याची विनंती केली होती. याची दखल घेत सत्ताधारी सदस्यांची बैठक रविवारी बोलावण्यात आली.

पालकमंत्री सतेज पाटील मुंबईला गेल्याने मंत्री मुश्रीफ यांनी एकहाती ही बैठक घेतली. सर्किट हाऊसवर तब्बल दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत मुश्रीफ यांनी सदस्य आणि पदाधिकारी यांचे स्वतंत्रपणे म्हणणे ऐकून घेतले.बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासने, डॉ. पद्माराणी पाटील व सदस्य उपस्थित होते.सदस्यांनी वाचले कारभाराचे पाढेबैठकीत सदस्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे पाढे वाचले. अध्यक्षांपासून कोणतेही पदाधिकारी समितीतील सदस्यांना निर्णय घेताना विचारात घेत नाहीत, हे उदाहरणांसह निदर्शनास आणून दिले. समितीचे सभापती सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात.पाठिंबा देऊन चूक केली का?जिल्हा परिषदेत सत्तेवर येताना महाविकास आघाडीला स्थानिक आघाड्यांनीही पाठिंबा दिला आहे; पण या सदस्यांनाही विचारात घेतले जात नाही, निधी देताना दुजाभाव केला जातो. आम्ही पाठिंबा देऊन चूक केली का? अशा शब्दांत स्थानिक आघाडीतील या सदस्यांनी मुश्रीफ यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली.पदाधिकारी निरुत्तरसदस्यांचे म्हणने ऐकल्यानंतर मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. सहा महिन्यांतच तुम्ही रंग दाखवले. तुमच्या काळात चांगल्या कामांची चर्चा होणार आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला. यावर पदाधिकारी निरुत्तर झाले.बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री मुश्रीफ यांनी बैठकीचा इतिवृत्तान्त सांगितला. पदाधिकारी विश्वासात घेत नाहीत, पदाधिकाऱ्यांनी स्वनिधी जादा घेतला आहे, अशा तक्रारी होत्या. अन्याय दूर करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. महाविकास आघाडीबाबत चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदस्य हातात हात घालून काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद