शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Khelo India Wrestling Kolhapur : कोल्हापूरसाठी कुस्ती केंद्र मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 12:04 IST

Wrestling Kolhapur : खेलो इंडिया अंर्तगत महाराष्ट्रासह एकूण सात राज्यांकरिता केंद्र सरकारने खेळानुसार केंद्र स्थापन करण्यास बुधवारी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या खेळांकरिता प्रत्येकी पाच लाखांचा निधीही मंजूर केला आहे. त्यात कोल्हापूरसाठी कुस्ती केंद्र होणार आहे.

ठळक मुद्देखेलो इंडिया अंर्तगत कोल्हापूरसाठी कुस्ती केंद्र मंजूर श़ड्डू पुन्हा घुमणार : महाराष्ट्रासाठी यादी जाहीर

सचिन भोसलेकोल्हापूर : खेलो इंडिया अंर्तगत महाराष्ट्रासह एकूण सात राज्यांकरिता केंद्र सरकारने खेळानुसार केंद्र स्थापन करण्यास बुधवारी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या खेळांकरिता प्रत्येकी पाच लाखांचा निधीही मंजूर केला आहे. त्यात कोल्हापूरसाठीकुस्ती केंद्र होणार आहे.केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ४ जून २०२० मध्ये देशात एक हजार खेलो इंडिया केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यातून खेळाचा विकास व्हावा. हा उद्देश ठेवून देशातील महाराष्ट्र, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये खेळ प्रकारानुसार केंद्रांना मंजुरी दिली आहे.

प्रत्येक केंद्रासाठी प्राथमिक निधी म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर केले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी पुढील प्रस्ताव तयार तो केंद्राला सादर करावयाचा आहे. जिल्हावार खेलो इंडियाच्या समिती स्थापन केली जाणार आहे. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्ह्यांकरिता खेळ प्रकारानूसार ही केंद्रे विकसित केली जाणार आहे. याबाबतची यादी भारतीय खेल प्राधिकरणकडून जाहीर करण्यात आली आहे.जिल्हावार केंद्र आणि खेळ असा,कोल्हापूर, लातूर, रायगड, हिंगोली (कुस्ती), सातारा, नाशिक, चंद्रपूर, सांगली, नंदुरबार, गोंदिया (मैदानी खेळ), वाशिम, सिंधुदुर्ग, बीड, मुंबई उपनगर (कबड्डी),पालघर, जळगाव, वर्धा, मुंबई शहर, अकोला (बॉक्सिंग), जालना, उस्मानाबाद (खो-खो), बुलढाणा, भंडारा, परभणी (तलवारबाजी), नांदेड (टेबल टेनिस), धुळे (फुटबॉल), हॉकी (यवतमाळ), औरंगाबाद (नेमबाजी), सोलापूर, नागपूर, ठाणे, रत्नागिरी, (बॅडमिंटन), गडचिरोली, अहमदनगर, अमरावती, (धनुर्विद्या), पुणे (व्हॉलिबॉल) यांचा समावेश आहे.

जून २०२० मध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ह्यखेलो इंडियाह्ण अंतर्गत कुस्तीच्या विकासासाठी हे केंद्र तयार केले आहे. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन कुस्तीपटूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्रासाठी प्रक्रिया निधी उपलब्ध झाल्यानंतर सुरू केली जाणार आहे.- डॉ. चंद्रशेखर साखरे ,जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :Wrestlingकुस्तीkolhapurकोल्हापूरKhelo Indiaखेलो इंडिया