शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्ती विकासकामांना मंजुरी द्या, कागल, गडहिंग्लज, उत्तूर नागरिकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 10:35 IST

कागल, गडहिंग्लज व उत्तूर मतदारसंघांत दलित वस्त्यांतील विकासकामे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनाअंतर्गत मंजूर आहेत; पण त्यांना राजकीय दबावापोटी प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याच्या निषेधार्थ या तिन्ही गावांतील नागरिकांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.  जिल्हाधिकारी दौलत देसाई व समाजकल्याण निरीक्षक संजय पवार यांना निवेदन देऊन विकासकामांना प्रशासकीय मंजुरी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देकागल, गडहिंग्लज, उत्तूर नागरिकांचा मोर्चाजिल्हाधिकारी, समाजकल्याण कार्यालयावर निदर्शने

कोल्हापूर : कागल, गडहिंग्लज व उत्तूर मतदारसंघांत दलित वस्त्यांतील विकासकामे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनाअंतर्गत मंजूर आहेत; पण त्यांना राजकीय दबावापोटी प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याच्या निषेधार्थ या तिन्ही गावांतील नागरिकांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.  जिल्हाधिकारी दौलत देसाई व समाजकल्याण निरीक्षक संजय पवार यांना निवेदन देऊन विकासकामांना प्रशासकीय मंजुरी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.आमदार हसन मुश्रीफ यांनी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने कागल मतदारसंघात ‘डॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजना २०१९-२०’ अंतर्गत विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. कागल, गडहिंग्लज व उत्तूर या मतदारसंघांतील दलित वस्त्यांमधील विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. शासनाने दलित वस्त्यांच्या विकासासाठी ही कामे मंजूर करून १२ दिवस उलटले तरीही राजकीय दबावापोटी या कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील यांनी केला. या कामांना प्रशासकीय मान्यता न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.दलित वस्तीच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याच्या आरोपावरून समाजकल्याण कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.या शिष्टमंडळात, जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील, भैया माने, जिल्हा परिषदेचे सदस्य शिल्पा खोत, कागल पंचायत समितीचे सभापती राजश्री माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह भोसले, सूर्यकांत पाटील, बळवंत माने, विकास पाटील, आदींचा समावेश होता.

राजकीय हस्तक्षेप होणार नाही : देसाई, पवारशिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई व समाजकल्याण निरीक्षक संजय पवार यांना निवेदन देऊन चर्चा केली. शिष्टमंडळाने, दलित वस्तीतील मंजूर झालेल्या कामांत कोणाचाही हस्तक्षेप न करता कामे आहेत तशी मंजूर करावीत, असा आग्रह धरला. त्याचवेळी कामात कोणताही हस्तक्षेप होणार नसल्याची ग्वाही देसाई, पवार यांनी शिष्टमंडळास दिली.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर