शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कोल्हापूर जिल्ह्याच्या ५२५ कोटींच्या खर्चाला मान्यता, निधी शंभर टक्के खर्च करण्याची पालकमंत्र्यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 14:16 IST

पावसाळ्यात परिख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये यासाठी पाणी उपशासाठी दर्जेदार पंप बसवा

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात शंभर टक्के निधी खर्च होईल, याची दक्षता घ्या, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मार्च २०२३ अखेर ५२५.१४ कोटींच्या झालेल्या खर्चाला मान्यता देण्यात आली. २०२३-२४च्या अर्थसंकल्पित ५९८.६७ कोटींपैकी मिळालेल्या ४८.३४ कोटींच्या तरतुदीचा आढावा घेण्यात आला.यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, पी.एन. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार उपस्थित अधिकारी उपस्थित होते.विविध योजनांसाठी राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आलेल्या अतिरिक्त मागणीनुसार २०२२-२३ मधील ४२५ कोटींच्या अर्थसंकल्पित निधीत ५५ कोटींची वाढ करुन जिल्ह्याला ४८० कोटींचा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी तरतुदीची माहिती दिली.

परिख पुलाखाली पंप लावा रे..पावसाळ्यात परिख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये यासाठी पाणी उपशासाठी दर्जेदार पंप बसवा. तोपर्यंत रोडओव्हर ब्रीजचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या.

प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नाही : जिल्हाधिकारीकेंद्र शासनाच्या प्रदूषित नद्यांमधील यादीतून आता पंचगंगा नदीचे नाव वगळण्यात आल्याची बाब आनंदाची असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, त्यांची लवकरच निविदा काढली जाईल. इचलकरंजीतील अन्य उद्योगांच्या पाण्यावरील प्रक्रियेसाठीचा डीपीआर तयार असून, एमआयडीसीकडून त्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच ८९ गावांमधून नदीत मिसळणारे सांडपाणी थांबविण्यासाठीही कार्यवाही सुरू आहे. पुढील अडीच वर्षात पंचगंगेचे प्रदूषण शून्य होणार आहे.

मानधनावर शिक्षक नेमायावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची १६१५ पदे रिक्त असून, मुलांनी शिक्षणासाठी जायचे कुठे, असा प्रश्न मांडला. अशाने विद्यार्थी गळती होईल त्यामुळे शिक्षक भरती होईपर्यंत मानधनावर नियुक्ती करावी, अशी सूचना केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर